ETV Bharat / state

सैल झालेली दरड काढण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ब्लॉक सुरू - highway saftey

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सैल झालेली दरड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खंडाळा बोगद्याजवळ १२ मार्च ते २० मार्च दरम्यान १५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग
author img

By

Published : Mar 12, 2019, 2:26 PM IST

पुणे - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सैल झालेली दरड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खंडाळा बोगद्याजवळ १२ मार्च ते २० मार्च दरम्यान १५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात येणार आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील ब्लॉकच्या वेळा जाहीर केल्या आहेत. महामार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना ब्लॉकच्या वेळा टाळून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्लॉकचा कालावधी

१) सकाळी १० ते १०:१५

2) सकाळी ११ ते ११:१५

3) दुपारी १२ ते १२:१५

४) दुपारी २ ते २:१५

५) दुपारी ३ ते ३:१५

शुक्रवार ते सोमवार या सुट्ट्यांच्या काळात द्रुतगती मार्गावर वाहतूक जास्त असते. म्हणून शुक्रवार १५ मार्चला दुपारी ३:१५ ते सोमवार १८ दुपारी १२ वाजेपर्यंत संबंधित रस्ता वाहतुकीसाठी खुला राहील. यापूर्वीही दरड हटवण्यासाठी एक्स्प्रेस वेवर ब्लॉक घेण्यात आला होता. पावसाळ्याच्या पूर्वी एक्स्प्रेसवेवरील दरड हटवण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.

Headline- सैल झालेले दरड काढण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ब्लॉक सुरू 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सैल झालेली दरड हटवण्यासाठी पुन्हा एकदा ब्लॉक घेतले जाणार आहेत. खंडाळा बोगद्याजवळ 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान 15 मिनिटांचे ब्लॉक घेतले जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील ब्लॉकच्या वेळा जाहीर केल्या आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना ब्लॉकच्या वेळा टाळून प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ब्लॉकचा कालावधी

1) सकाळी 10 ते 10:15
2) सकाळी 11 ते 11:15
3) दुपारी 12 ते 12:15
4) दुपारी 2 ते 2:15
5) दुपारी 3 ते 3:15

शुक्रवार ते सोमवार या वीकेंड आणि वीकेंडभोवतालच्या दिवसात द्रुतगती मार्गावर ताण येतो. म्हणून शुक्रवार 15 मार्च दुपारी 3:15 ते सोमवार 18 दुपारी 12 वाजेपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी खुला राहील.

यापूर्वीही दरड हटवण्यासाठी एक्स्प्रेस वेवर ब्लॉक घेण्यात आले होते. पावसाळ्याच्या पूर्वी एक्स्प्रेस वे वरील दरड हटवण्याचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.