ETV Bharat / state

Ashok Sarafs Amrit Mahotsav : अशोक मामा सारखा दागिना सराफांच्याच घरी तयार होऊ शकतो - राज ठाकरे - Organizing Ashokaparva program

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) म्हणाले आहेत. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ( 75th birthday ) पुण्यामध्ये अशोकपर्व कार्यक्रमाचे आयोजन ( Organizing Ashokaparva program ) करण्यात आले होते. अशोक सराफ यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे असे म्हणाले आहेत.

Ashok Sarafs Amrit Mahotsav
अशोक सराफांचा अमृत महोत्सव
author img

By

Published : Jan 9, 2023, 8:48 AM IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे

पुणे : कलाकार काय असतो हे परदेशात गेल्याशिवाय कळत नाही. आपल्या देशात प्रतिमा जास्त जपल्या जातात प्रतिभेला महत्त्व दिल जात नाही. त्यामुळे कलाकारांचे महत्त्व कळत नाही. अशोक सराफ हे अभिनेते जर परदेशात असतील त्यांचा 75 वा वाढदिवस असतात तर त्या देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी आले असते ते जर दक्षिणेत असते, तर राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. (Ashok Sarafs Amrit Mahotsav ) परदेशात कलाकाराच्या नावाने एअरपोर्ट असतात. आपल्या देशात चौक असतात ही आपली खंत आहे असे मत मनसे प्रमुख राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांनी पुण्यात व्यक्त केले आहे.

राज ठाकरे यांच्या हस्ते सन्मान : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यावेळी बोलताना एखादा कलाकार एवढे वर्ष आपले कुतूहल समाजात जागृत ठेवतो आणि आजही तेवढाच विनोद करून हसवतो ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे अभिनेते अशोक सराफ महान आहेत. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. परंतु त्या उंचीचे माणस आता राहिले नाहीत म्हणून ते मला करावे लागते असे सुद्धा राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

कलाकारांना सन्मान दिला जात नाही : अशोक मामा सारखा दागिना सराफांच्याच घरी तयार होऊ शकतो हे मला पटलेला आहे. या सगळ्या कलावंत अभिनेत्यामुळे देशांमध्ये आपण काही गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकलो आणि त्यामुळे देश अराजकतेपासून वाचला. त्यामुळे ही सगळी मोठी माणस आहेत. त्यांच्यामुळे हा समाज घडलेला आहे. आपल्याकडे कलाकारांना सन्मान दिला जात नाही. एखादा कलाकार आहे म्हटले की हा कलाकार आहे का ? ओके एवढेच म्हटले जाते असे म्हणत त्याने कलाकारांना मिळणाऱ्या सन्मानाविषयी सुद्धा भाष्य केलेला आहे.

अमृत महोत्सव वर्ष : अशोक सराफ यांचा मूळ घराण हे बेळगाव मधला आहे. परंतु त्यांचा जन्म मुंबईत झाला. यावेळी बोलताना खरा सीमा प्रश्न तर अशोक मामाने सोडवला आहे. असे म्हणत सध्या राज्यभर गाजत असलेल्या सीमा प्रश्नाविषयी सुद्धा राज ठाकरे यांनी मिश्किल पणे टोला हाणला आहे. पुण्यातील कोथरूड येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये अशोक सराफ यांच्या अमृत महोत्सव वर्ष यानिमित्त तीन दिवस वेगवेगळ्या नाटकाचे प्रयोग आणि कार्यक्रम ठेवण्यात आले होते. शेवटच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री व अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता जोशी सराफ उपस्थित होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.