बारामती- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने लॉकडाऊनच्या काळात पोलीस प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बारामती उपविभागात सुमारे 1 हजार 425 कारवाया करण्यात आल्या आहेत. बारामती उपविभागामध्ये प्रशासन, आरोग्य प्रशासन आणि पोलिसांनी कंबर कसून आपले कर्तव्य बजावल्याने कोरोनाला थोपवण्यात यश मिळवले.
विनाकारण रस्त्यावर फिरणे, समाज माध्यमावर अफवा पसरवणे, मास्कचा वापर न करणे, अवैद्य दारू विक्री तसेच टाळेबंदीत मनाई असतानाही दुकाने चालू ठेवणे तसेच चढ्या भावात वस्तूंची विक्री करणे, वाहतुकीस बंदी असतानाही वाहतूक करणाऱ्या 1 हजार 425 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात 67 जणांना शिक्षाही झाली आहे. पोलीस प्रशासनाकडून बारामती उपविभागातील बारामती शहर, तालुका, वडगाव निंबाळकर इंदापूर, वालचंदनगर, भिगवण या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया सुरू असल्याने विनाकारण फिरणाऱयांची संख्या कमी झाली आहे. तसेच टाळेबंदीचा गैरफायदा घेत चढ्या भावाने वस्तू विकणाऱया दुकानदारांवरही वचक बसला. या कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
बारामती उपविभागात प्रशासन, आरोग्य प्रशासन व पोलीस प्रशासनाने अहोरात्र कष्ट घेतल्याने उपविभागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकला नाही. पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवुन वेळोवेळी कारवाया सुरू ठेवल्याने विनाकारण घराबाहेर फिरणा-यांची संख्या कमी झाली. तसेच अवैध धंद्यावर ही कारवाई करून अवैद्य धंदे नेस्तनाबुत केले आहेत. व ही कारवाई पुढेही चालू राहणार आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.
दुकांनावर केलेली कारवाई - बारामती शहर (13) , बारामती तालूका (11) , वडगाव निंबाळकर (11) , बारामती एकूण (35) , वालचंदनगर (9) , इंदापूर (6) , भिगवण (17) , इंदापूर एकूण (32) , उपविभागीय एकूण (67)
विनाकारण फिरणाऱयांवर केलेली कारवाई - बारामती शहर (214) , बारामती तालूका (131) , वडगाव निंबाळकर (94) , बारामती एकूण (439) , वालचंदनगर (4) , इंदापूर (6) , भिगवण (32) , इंदापूर एकूण (42) , उपविभागीय एकूण (481)
वाहन जप्त कारवाई - बारामती शहर (99) , बारामती तालूका (97) , वडगाव निंबाळकर (108) , बारामती एकूण (304) , वालचंदनगर (26) , इंदापूर (128) , भिगवण (50) , इंदापूर एकूण (204) , उपविभागीय एकूण (508)
दारू बंदी कारवाई - बारामती शहर (28) , बारामती तालूका (53) , वडगाव निंबाळकर (37) , बारामती एकूण (118) , वालचंदनगर (22) , इंदापूर (51) , भिगवण (15) , इंदापूर एकूण (88) , उपविभागीय एकूण (206)
सोशल मीडियावर अफवा पसरवल्याप्रकरणी कारवाई - बारामती शहर (3) , बारामती तालूका (5) , वडगाव निंबाळकर (2) , बारामती एकूण (10) , वालचंदनगर (2) , इंदापूर (1) , भिगवण (1) , इंदापूर एकूण (4) , उपविभागीय एकूण (14)
विनामास्क फिरल्याप्रकरणी कारवाई - बारामती शहर (73) , बारामती तालूका (00) , वडगाव निंबाळकर (41) , बारामती एकूण (114) , वालचंदनगर (13) , इंदापूर (22) , भिगवण (00) , इंदापूर एकूण (35) , उपविभागीय एकूण (149)