ETV Bharat / state

Maharashtra Rain Update Today: राज्यात येत्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कसे असेल? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

राज्यात या आठवड्यामध्ये पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. महाराष्ट्रातल्या चारही विभागांमध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. वाऱ्याच्या कमी दाबाचा पट्टा नाहीसा झाल्याने पावसाची तीव्रता कमी झाली आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

Maharashtra Rain Update Today
महाराष्ट्रातील पावसाचे आजचे अपडेट
author img

By

Published : Jul 30, 2023, 11:46 AM IST

महाराष्ट्रातील पावसाचे आजचे अपडेट

पुणे : मागील 15 दिवसांपासून पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील देण्यात आला होता. कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर, रायगड, कोकण या भागात तर पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार असल्याचे हवामान तज्ज्ञ शिल्पा आपटे सांगितले आहे. पुढील 3 ते 4 दिवस राज्यात पावसात घट होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पाचही दिवस पावसाची शक्यता : कोकण गोव्यात पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 जुलै ते एक ऑगस्ट कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात किनारपट्टीवर पुढील पाचही दिवस सोसासाठ्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पाचही दिवस पावसाची शक्यता आहे. आणि घट विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात 31 जुलैला आणि एक ऑगस्टला तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजेच्या कडकडटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक ऑगस्टला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे- हवामान तज्ज्ञ शिल्पा आपटे

मुसळधार पावसाची शक्यता : पुणे विभागातल्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 जुलै ते 4 ऑगस्ट आकाश ढगाळ असणार आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण पूर्ण भरलेले आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. आता दर गुरुवारी बंद असलेला पाणीपुरवठा सुद्धा चालू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे, तरी या आठवड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पुणे जिल्ह्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 2 ऑगस्टच्या आसपास राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Pune Sees Lowest Rainfall : चिंता वाढली पुण्यात 10 वर्षातील सर्वात कमी पाऊस, पुढील आठवड्यात बरसण्याची शक्यता
  2. Chandrapur Flood : चंद्रपूर जिल्ह्यात पुराचे थैमान; जिल्हास्तरावर बचावकार्य सुरू
  3. Hingoli Monsoon : वसमत तालुक्यात मुसळधार पावसाने तलावाची फुटली भिंत; अनेकांच्या घरात शिरले पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.