पुणे: देशात यंदा लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवार गटाचे नेते तसेच राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यात आज मंत्री हसन मुश्रीफ आले असताना माध्यमांशी बोलत होते.
राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आमच्या दोन्ही जागा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. पण, पक्षानं जबाबदारी दिली तर मी लोकसभा लढवेन. तसंच जागा वाटपाच्या संदर्भात तिन्ही पक्षातील नेते हे बसून निर्णय घेणार आहेत. तिन्ही पक्षांच्या चर्चा सुरू आहेत.
अजित पवार हे राष्ट्रवादीच्या ( अजित पवार गट) जिल्हाध्यक्षांना गाड्या देणार असल्याबाबत माहिती नाही. गाड्या कधी व कोण देणार हे मला माहिती नाही. त्याबाबत माहिती घेऊन सांगता येईल-मंत्री हसन मुश्रीफ
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम हे मांसाहार करत होत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केल होतं. त्या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटले होते. त्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, याबाबत हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या प्रतिक्रियेशी सहमती दाखविली आहे.
अमोल कोल्हे भेकडासारखे पळून जात होते- मंत्री मुश्रीफ म्हणाले की, लोकांची आस्था असते. त्यातून असं बोलणे टाळले पाहिजे. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत आहे. अमोल कोल्हे यांच्या राजीनाम्याबाबत मुश्रीफ यांना विचारलं असता ते म्हणाले की, खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचं सांगितलं होतं. तसंच मी राजकारण बंद करणार असल्याचं म्हटलं होते. तेव्हाच ते भेकडासारखे पळून जात होते, अशी टीका यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली.
महायुतीकडून लोकसभा निवडणुकीची कशी तयारी सुरू आहे?- लोकसभा 2024 निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी महायुतीकडून राज्यभरात मोठे नियोजन करण्यात आलं आहे. येत्या 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय मेळावे घेण्यात येणार आहेत. त्यानंतर महायुतीकडून जास्तीत लोकापर्यंत पोहोचण्याकरिता तालुकास्तरावर आणि बूथस्तरापर्यंतचे मेळावे होणार आहेत. शिंदे-फडणवीस-पवारांच्या नेतृत्वात महायुती राज्यात लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत केला.
हेही वाचा-