शिरूर (पुणे) - रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील कारेगाव येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहाणाऱ्या प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज (शनिवार) स्वतःहून हजर होऊन माझ्याकडून माझ्या प्रेयसीचा खून केल्याची कबुली देऊन मला फाशी द्या, असे म्हणाला. किरण फुंदे असे प्रियकराचे नाव असून सोनामनी कान्हु सोरेन (वय 24) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे.
प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याची घटना आज 15 ऑगस्टच्या सकाळी समोर आल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रांजणगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रांजणगाव जवळील कारेगाव येथे किरण फुंदे व सोनामनी सोरेन हे दोघे तरुण-तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. दरम्यानच्या काळात प्रेयसी गर्भवती होती. यातून गर्भ वाढवायचा नसल्याचे प्रियकर किरण याने सांगितल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. याच वादातून प्रियकर किरणने प्रेयसीचा गळा आवळला व घराला बाहेरून कुलुप लावुन थेट रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. आपण आपल्या प्रेयसीचा गळा दाबन खून केल्याची कबुली दिली व आपण केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून मला फाशी द्या, असे लिहून कागद पोलिसांकडे सूपूर्त केला.
औद्योगिक वसाहत परिसरात राज्य परराज्यात अनेक तरुण तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहतात. मात्र, हे रिलेशन फार काळात टिकत नसल्याने यातून विपरीत घटना घडत असल्याने ही चिंतेची बाब आहे.
पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून गर्भवती प्रेयसीचा खून
रांजणगाव जवळील कारेगाव येथे किरण फुंदे व सोनामनी सोरेन हे दोघे तरुण-तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. दरम्यानच्या काळात प्रेयसी गर्भवती होती. यातून गर्भ वाढवायचा नसल्याचे प्रियकर किरण यांने सांगितल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. वादातून प्रियकर किरणने राहत्या घरात प्रेयसीचा गळा आवळला.