राजगुरुनगर (पुणे) - पुणे - नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचे कारण बनत असलेला खेड घाटातील बाह्यवळण रस्ता सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे राजगुरूनगर शहर व त्यापुढील मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. आज (रविवार) घाटात अंतिम टप्प्याच्या कामाची पाहणी शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
पुणे - नाशिक महामार्गावर खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तुकईवाडी हद्दीतील झणझण स्थळ येथे सुमारे तीनशे मीटर अंतराचे काम बाकी आहे. त्यातील महत्वाचा व अवघड भाग असलेल्या भुयारी मार्गाचे काम पुर्ण झाले आहे. ८० मीटर लांब, ११ मीटर उंच आणि ८ मीटर रुंदी असलेल्या पुलाचे आरसीसी कामावर मातीमुरूम भराव करण्यात येत आहे. अत्यल्प असलेला भराव आणि त्यांनंतर रस्त्यावर डांबरीकरण, संरक्षक कठडे हे काम होणार आहे. पुढील दीड महिन्यात हे काम पुर्ण होऊन नागरिकांना घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात येईल असे पाहणीवेळी आढळराव पाटील यांनी सांगितले.
'पुणे - नाशिक महामार्गावरील खेडघाट बाह्यवळण रस्ता सप्टेंबरमध्ये होणार खुला' - खेडघाट बाह्यवळण रस्ता सप्टेंबरमध्ये होणार
पुणे - नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचे कारण बनत असलेला खेड घाटातील बाह्यवळण रस्ता सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे राजगुरूनगर शहर व त्यापुढील मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे.