ETV Bharat / state

Cyber Fraud: ओटीपी न देता जर सायबर फ्रॉड झाला; तर आरबीआयला 3 दिवसात तक्रार द्या, पैसे परत येतील, अर्पित दोशी सायबर तज्ञ

Cyber Fraud: सायबर गुन्हेगार पहिल्या सुरू तुम्हाला मोबाईलवरती ओटीपी पाठवतात. कुठलाही ओटीपी तुम्हाला कुणालाही शेअर केला नाही पाहिजे .जर तो ओटीपी दिला गेला तर तुमचा सर्वच खाजगी जो माहिती आहे. ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि त्यातून हे सायबर गुन्हेगार पैसे वळवतात, असं सायबर तज्ञांचे म्हणणं आहे.

Cyber Fraud
Cyber Fraud
author img

By

Published : Nov 12, 2022, 11:22 AM IST

पुणे: कोरोना लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे मालक आदर पुनावाला यांना सायबर गुन्हेगारांकडून एक कोटीचा गंडा घालण्यात आला. त्या गुन्हेगारांना आता पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. हे बिहार मधले सगळे गुन्हेगार आहेत .परंतु एवढ्या मोठ्या उद्योजकांना जर गंडा घातला जातो. तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. हा सायबर गुन्हा नेमकं करतात कसा, यात नेमक आपण कुठे फसवल जातं. याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

अर्पित दोशी सायबर तज्ञ

ओटीपी शेअर करायचं नाही: सायबर गुन्हेगार पहिल्या सुरू तुम्हाला मोबाईलवरती ओटीपी पाठवतात. कुठलाही ओटीपी तुम्हाला कुणालाही शेअर केला नाही पाहिजे .जर तो ओटीपी दिला गेला तर तुमचा सर्वच खाजगी जो माहिती आहे. ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि त्यातून हे सायबर गुन्हेगार पैसे वळवतात, असं सायबर तज्ञांचे म्हणणं आहे. त्यासाठी आपण कुणालाही आपला ओटीपी शेअर करायचं नाही. कुठल्याही नवीन लिंक वरती आपण क्लिक करायचं नाही. ज्यावेळेस आपल्याला हे सर्व खात्रीशीर आहे. असे वाटल्यानंतरच ओटीपी आणि लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा, असे अर्पित दोशी सायबर तज्ञ सांगतात.

आपण थोडीशी काळजी घ्यावी: इंडस्ट्रियल फ्रॉड हा फार मोठ्या प्रमाणात होतो. कारण आदर पूनावाला या केसमध्ये त्यांच्याच मॅनेजरच्या फोनवर काही ओटीपी आले. आणि त्यातून हे सगळे पैशाचा फ्रॉड झाला. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आर्थिक देवाण- घेवाण होते. त्यावेळी ती देवाण- घेवाण करताना आपण थोडीशी काळजी घ्यावी. आपण पैसे पाठवते वेळेस त्या व्यक्तीला फोन लावून विचारावा, मी तुम्हाला पैसे पाठवू का ? आणि आल्यानंतर ते आलेत का ? कारण एवढं केलं तर आपला फसवणूक होणार नाही. ते आपण विचारत नाही. आणि डायरेक्ट आपण पैशाची ट्रान्सफर करतो. किंवा ओटीपी ट्रान्सफर करतो. त्यामुळे मोठा धोका संभवतो, तेवढी काळजी इंडस्ट्रियल लोकांनी घ्यावी असेही सायबर तज्ञ अर्पित दोशी यांनी सांगितलेला आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया ही जबाबदारी घेत: पण काही प्रकरणात असं होतं की, आपण सगळीच काळजी घेतो. परंतु सायबर गुन्हेगार कधी कधी ओटीपी न घेता. ही पैसे याची अफरातफर करतात. परंतु आपण कुणालाच ओटीपी दिला नाही. आपण कुठेच कुठल्याच लिंकला क्लिक केलं नाही. जर आपले पैसे आर्थिक व्यवहारात गेले, तर त्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ही जबाबदारी घेत असते. असा जीआर रिझर्व बँकेने काढलेला आहे. आणि रिझर्व बँकेच्या कामकाजाच्या 3 दिवसाच्या आत, जर आपण हे त्यांना कळवलं की मी कुठलाही ओटीपी दिला नाही. मी कुठलीही लिंक दिली नाही. परंतु माझे पैसे कट झाले तर, ते पैसे आपल्याला रिझर्व बँकेकडून परत मिळतात.

फोन लावून बोलणं गरजेचं: त्यामुळे तो एक सायबर गुन्हा झाल्यानंतर सुद्धा पैसे मिळण्याची शाश्वती रिझर्व बँककडून असते. पण त्याआधी आपल्याला तेवढी काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपण जे व्यवहार करतो. त्या व्यवहार अगोदर त्या व्यक्तीशी एक फोन लावून बोलणं गरजेचं आहे. पैसे आले गेल्यानंतर फोन लावून बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे भामटे आहेत, त्यांच्या जाळ्यात आपण फसणार नाही. एवढी खबरदारी नागरिकांना घेणे गरजेचे आहे. असे सायबर तज्ञ अर्पित दोषी याने म्हटलेलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.