ETV Bharat / state

हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन अन् जैन श्रावक संघाच्या माध्यमातून दोनशे नागरिकांना जेवण

author img

By

Published : Apr 10, 2020, 7:42 PM IST

Updated : Apr 10, 2020, 8:45 PM IST

राजगुरूनगर शहरात सुरुवातीपासून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम सुरु करुन दररोज दोनशेपेक्षा जास्त नागरिकांना जेवणाची घरपोच सुविधा उपलब्ध दिली आहे. त्यानंतर शिवभोजन थाळी शहरात सुरु झाली असून त्यातून शंभर लोकांना एकवेळचे जेवण दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत शरद भोजन योजनेच्या माध्यमातून वयोवृद्ध, दिव्यांग निराधांना दोन वेळेचे जेवण अंगणवाडी सेविकांमार्फत दिले जात आहे. आजपासून हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशन, जैन श्रावक संघाच्या माध्यमातून दोनशे नागरिकांना जेवणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जेवणासाठी रांगेत उभे असलेले नागरिक
जेवणासाठी रांगेत उभे असलेले नागरिक

राजगुरूनगर (पुणे) - राजगुरनगर शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात कोणीही गरीब गरजू उपाशी झोपू नये म्हणून येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन, जैन श्रावक संघाच्या माध्यमातून राजगुरूनगर बसस्थानकात रोज दोनशे नागरिकांना मोफत जेवणाची सोय आजपासून (दि.१० एप्रिल) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन अन् जैन श्रावक संघाच्या माध्यमातून दोनशे नागरिकांना जेवण
कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी देशात संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे सर्वजण घरात आहेत. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्यांची संख्या राजगुरुनगर शहरात मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांना याकाळात जेवणासाठी साहित्य घेणेही अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीचे संकट आले आहे. असे असताना शहरातील काही सामाजिक बांधिलती जपणाऱ्या संस्था पुढाकार घेत दानशूर वृत्तीने जमेल ती मदत करत आहेत. आळंदी, चाकण राजगुरुनगर शहर व आदिवासी, कातकरी, ठाकरे वस्तीत गरीब गरजू नागरिकांची उपासमार होऊ नये. यासाठी जेवणाची व अन्न धान्य देण्यासाठी हजारो हात सरसावले आहेत.राजगुरूनगर शहरात सुरुवातीपासून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम सुरू करुन दररोज दोनशे पेक्षा जास्त नागरिकांना जेवणाची घरपोच सुविधा उपलब्ध दिली आहे. त्यानंतर शिवभोजन थाळी शहरात सुरू झाली असून त्यातून शंभर लोकांना एकवेळचे जेवण दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत शरद भोजन योजनेच्या माध्यमातून वयोवृद्ध, दिव्यांग निराधांना दोन वेळेचे जेवण अंगणवाडी सेविकांमार्फत दिले जात आहे. आजपासून हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन, जैन श्रावक संघाच्या माध्यमातून दोनशे नागरिकांना जेवणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. चाकण परिसरातील कामगारांना अनेकांच्या माध्यमातून सुमारे 3 हजार नागरिकांना जेवण दिले जात आहे. चाकण एमआयडीसीमधील कंपन्यांनी पुढाकाराने अनेकांना किराणा व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा - कोरोना इतकंच शेतकऱ्यांसमोर जगण्याचं संकट मोठं ; शेतीसह जोडव्यवसाय संकटात

Last Updated : Apr 10, 2020, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.