ETV Bharat / state

...तर आम्ही कायदा हातात घेऊ; पुण्यातील विद्यार्थिनींसह महिलांनी पंतप्रधानांना पाठवली १०० पत्रे

या पत्रात मोदी यांना भावनिक आवाहन करण्यात आले आहे. 'आपण भारत देशात खूप छान प्रमाणात सुधारणा करत आहात तर महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात ठोस कायदा का करत नाहीत? आमचे हे पत्र आपल्याला मिळाल्यानंतरही ठोस पाऊल उचलले नाही, तर आम्ही कायदा हातात घेऊ, असे सांगण्यात आले आहे.

pune
निषेध व्यक्त करताना गावातील महिला व मुली
author img

By

Published : Dec 5, 2019, 12:06 PM IST

पुणे- हैदराबाद येथील डॉ.युवतीवर अत्याचार करुन तिचा निर्घृन खूण करण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. पुण्यातही या अमानुष कृत्याचा निषेध करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील भामचंद्रनगर वासुली येथील राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या वतीने पीडित तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी गावातील महिलांनी व मुलींनी लिहिलेली १०० पत्रे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली.

निषेधनिषेध व्यक्त करताना गावातील महिला व मुली

या पत्रात मोदी यांना भावनिक आवाहन करण्यात आले आहे. 'आपण भारत देशात खूप छान प्रमाणात सुधारणा करत आहात तर महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात ठोस कायदा का करत नाहीत? आमचे हे पत्र आपल्याला मिळाल्यानंतरही ठोस पाऊल उचलले नाही, तर आम्ही कायदा हातात घेऊ. जर सरकारकडून काहीच होऊ शकत नसेल तर आम्हाला शस्र बाळगण्याची परवानगी मिळाली पाहिजे. आणि मुलींना शाळेत लैंगिक शिक्षण मिळावे, त्याचप्रमाणे आत्मरक्षणाचे मोफत शिक्षण मिळावे, असा संदेश महिलांकडून पंतप्रधानांना करण्यात आला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत संस्थेची भूमिका स्पष्ट करताना, बलात्कार करणाऱ्या नराधमांना शासनाने कडक शिक्षा करावी. तसेच अशा अमानुष कृत्यांना आळा बसण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करावी, असे पत्रात नमूद केल्याचे सांगण्यात आले आहे.

तीन वर्षीपूर्वी कोपर्डीत मुलीवर बलात्कार करून खून झाल्याच्या घटनेने अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता. जन उद्रेकामुळे अशा गंभीर घटनांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट चालू झाले. या घटना ताज्या असतानाच पुन्हा हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण देश हादरला. ठिक-ठिकाणी मोर्चा आंदोलनाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा स्त्री सुरक्षेचा प्रश्न पुढे आला. या घटनेचे पडसाद ग्रामीण भागातही दिसू लागले आहेत.

हेही वाचा- शिरुरमध्ये अवैध वाळू उपसा; महसूल विभागाच्या कारवाईत 3 कोटींचा मुद्देमाल जप्त

Intro:Anc__पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भामचंद्रनगर वासूली येथील राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या वतीने डॉ प्रियांका रेड्डी यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज गावातील महिलांनी लिहिलेली 100 पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली.

या पत्रात मोदी यांना भावनिक आवाहन करण्यात आले आहे की "आपण भारत देशात खूप छान प्रमाणात सुधारणा करत आहात तर मग आम्हा महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात ठोस कायदा का करत नाहीत?"आमचं हे पत्र आपल्या ला मिळाल्या नंतरही ठोस पाऊल उचलले नाही तर आम्ही महिला आमचा कायदा आम्हीच हातात घेऊ.जर सरकार कडून काहीच होऊ शकत नसेल तर आम्हाला शस्र बाळगण्याची परवानगी मिळायला पाहिजे आणि मुलींना शाळेत लैंगिक शिक्षण मिळावे त्याचप्रमाणे लाठी काठीचे मोफत शिक्षण मिळावे."

ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या खेड तालुक्यातील वासुली येथील राजमाता जिजाऊ महिला संस्थेने हैद्राबादेतील उच्चशिक्षीत व्यावसायाने डॉक्टर असलेल्या प्रियंका रेड्डी या तरुणीचा बलात्कार करुन जाळून निर्घून खुन केला गेला या अमानवी कृत्या विरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठी निषेध मोर्चा काढला होता यावेळी पत्रकार परिषदेत संस्थेची भूमिका स्पष्ट करताना, बलात्कार करणाऱ्या नराधमांना शासनाने कडक शासन करावे, आणि अशा अमानुष कृत्यांना आळा बसण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करुन पंतप्रधान नरेंद मोदी व महाराष्ट्र शासनाला 100 महिला मुलीनी आपल्या स्वहस्ताक्षरात निवेदनरुपी पत्र लिहिली असून ती पोस्टाने पाठविणार असल्याचे सांगितले.

तीन वर्षींपुर्वी कोपर्डीत मुलीवर बलात्कार करुन खून झाल्याच्या घटनेने अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता. तोच दिल्लीतील निर्भया हत्याकांडाने सारा देश हळहळला. जन उद्रेकामुळे अशा गंभीर घटनांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट चालू झाले. या घटना ताज्या असतानाच पुन्हा हैद्राबादेच्या तरुणीवर झालेल्या अमानूष कृत्याने संपुर्ण देश हादरला. ठिक ठिकाणी मोर्चा आंदोलनाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा मुली बाळींच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला. आणि या घटनेचे पडसाद ग्रामीण भागातही दिसू लागले आहेत.

Byte__उषा पापडे,
Byte__ रत्ना पिंगळे,
Byte__वृषाली चोरगे,
Byte__डॉ.अपर्णा शिंदे,Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.