ETV Bharat / state

पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, बंदुकीची गोळी मोबाईलला लागल्याने वाचला जीव - pune crime news

गुन्हे शाखेचे पथक शहर परिसरात गस्त घालत असताना त्यांना काही व्यक्तीजवळ पिस्तुल असून त्यांनी गोळीबार केली असल्याची माहिती मिळाली होती. पिस्तुल कुठून आणली याबाबत चौकशी करीत असताना हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
author img

By

Published : Mar 29, 2021, 12:24 PM IST

Updated : Mar 29, 2021, 1:44 PM IST

पुणे - शहरातील दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपींनी या मुलीला वाढदिवसाच्या पार्टी निमित्त घेऊन जाऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीने या सर्व प्रकारांना विरोध केला असता तिच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यामुळेच हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी पाच जणांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - गांजाची विक्री करताना महिलेला अटक; घरातून गांजा, चरससह 6.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

विरोध करताच पीडितेवर झाडली गोळी
जनता वसाहत परिसरात पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. 15 दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या एका मैत्रिणीने आपल्याला एका मित्राच्या वाढदिवसाला जायचे आहे असे सांगून तिला वारजे परिसरात नेले. त्याठिकाणी वाढदिवस साजरा झाल्यानंतर एका खोलीत नेऊन पीडित मुलीवर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकारानंतर घाबरलेली मुलगी घरी जाण्यासाठी निघाली असता आरोपींनी तिला आणखी दोघे येणार आहेत त्यामुळे घरी जाऊ नकोस असे सांगत तिला अडवून ठेवले. तरीही पीडित मुलगी घरी जाण्यासाठी निघाली असता एका आरोपीने तिच्या दिशेने गोळी झाडली. पीडित मुलीने यावेळी छातीजवळ मोबाईल ठरलेला असल्यामुळे ही बंदुकीची गोळी या मोबाईलवर लागली. त्यामुळे सुदैवाने तिला गंभीर दुखापत झाली नाही. आरोपींनी त्यानंतर पीडितेसोबत असलेल्या दुसऱ्या मुलीला तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले.

हेही वाचा - नाशिक; खंडणीच्या वादातून जाळल्या चायनीज गाड्या; दोन संशयित ताब्यात

अशी उघडकीस आली घटना
गुन्हे शाखेचे पथक शहर परिसरात गस्त घालत असताना त्यांना काही व्यक्तीजवळ पिस्तुल असून त्यांनी गोळीबार केली असल्याची माहिती मिळाली होती. पिस्तुल कुठून आणली याबाबत चौकशी करीत असताना हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलीचा शोध घेत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Last Updated : Mar 29, 2021, 1:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.