ETV Bharat / state

पुण्यातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील आगीवर नियंत्रण; जीवितहानी नाही

ग्णालयाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. परंतु, अथक प्रयत्नानंतर त्यांनी अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या जवानाकडून सांगण्यात आले.

contontment hospital of pune  contontment hospital of pune fire  pune fire news
पुण्यातील गोळीबार मैदानाजवळील कॅंटोनमेंट रुग्णालयात आग
author img

By

Published : Sep 5, 2020, 12:30 PM IST

Updated : Sep 5, 2020, 2:16 PM IST

पुणे - पुण्यातील कॅटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील 'ऑपरेशन थिएटर'मध्ये आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेl अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे.

पुण्यातील गोळीबार मैदानाजवळील कॅटोनमेंट रुग्णालयात आग
पुण्यातील गोळीबार मैदानाजवळ हे रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमधून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धूर येताना दिसला. त्यानंतर आग लागल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना फोन करून याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागली तेव्हा रुग्णालयात काही रुग्ण होते. परंतु, वेळीच त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. परंतु, अथक प्रयत्नानंतर त्यांनी अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या जवानाकडून सांगण्यात आले.

Last Updated : Sep 5, 2020, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.