ETV Bharat / state

परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल - farmers crop

राज्याच्या राजकारणांची समीकरणे कशी आणि केव्हा जुळून येतील, हे कळायला मार्ग नाही. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत. यंदाच्या या ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडांशी आलेला घास हिरावून घेतल्याची परिस्थिती आहे.

परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान
author img

By

Published : Nov 14, 2019, 8:53 PM IST

पुणे - हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिसकावल्याने राज्यभरातील शेतकरी हवालदील झाला आहे. काढणीला आलेले व काढलेले पीक परतीच्या पावसाने पुन्हा शेतातच भिजल्याने शेतकऱ्यांच्या काबाड कष्टासह त्यांचे पीक वाया गेले आहे. बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या भागातील ८२ हजार १२८ शेतकऱ्यांचे ४३ हजार ७३१ हेक्टर शेतीक्षेञ अवकाळी पावसाने बाधीत झाले आहे. सध्या पेरण्यांचा हंगाम सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले. मात्र, अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान

राज्याच्या राजकारणांची समीकरणे कशी आणि केव्हा जुळून येतील. हे कळायला मार्ग नाही. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत. यंदाच्या या ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडांशी आलेला घास हिरावून घेतल्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. त्यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळेल? याची हे माहिती नाही. त्यामुळे अन्नदात्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील अनेक भागात सततची नापिकी आणि ओल्या दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतीचा आढावा घेण्यासाठी आम्ही बारामती तालुक्यातील मळद गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. ५ हजार ६२८ लोकसंख्या असलेल्या या गावातील ६० टक्के नागरिक शेती करतात. सोयाबीन, मका, कडवळ, ऊस, वांगी, भेंडी यासारखी पीके घेतली जातात. माञ, यावेळी पडलेल्या अवकाळी पावसाने राज्यासह येथील शेतकऱ्यांनाही अडचणीत टाकले आहे. या भागात शेतकऱ्यांनी घेतलेल्या ४० ते ५० एकरातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढून ठेवलेले सोयाबीन पावसाने भिजून पुन्हा त्याला कोंब फुटले आहे. १० टक्के देखील सोयबीन पिकाचे उत्पादन होणार नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानीची किमान ७५ टक्के मदत व्हावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

मदत मिळणार कधी?
अवकाळी पावसामुळे राज्यभरात झालेल्या शेतमालाच्या नुकसानीनंतर मुख्यमंत्र्यांनी तात्पुरत्या स्वरुपात १० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली. माञ, सद्यस्थितीत या तरतुदीच्या रकमेवर कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे १० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीची केवळ घोषणाच ठरली आहे.

बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या चारही तालुक्यातील ज्वारी, बाजरी, कांदा, भाजीपाला, सोयाबीन, द्राक्ष, डाळिंब या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुका स्तरावरुन पंचनामे करून एकञित अहवाल तयार करण्यात आला आहे. या चार तालुक्यातील ४६१ गावातील ८२ हजार शेतकऱ्यांच्या ४३ हजार ७३१ शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्यात आले आहे. अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात येणार असून आलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे उपविभागीय कृषीअधिकारी बालाजी ताटे यांनी सांगितले.

मदतीची आशा - शेतकरी
पंचमाने करून आठ दिवस झाले. अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. ४० ते ५० एकर सोयाबीन तसेच १० एकर वांगी पीक पूर्णपणे वाया गेले आहे. एकरी ४ लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, आत्ता निम्मेही उत्पन्न मिळणार नाही. निकालानतंर अद्याप सरकार स्थापन न झाले नाही. त्यामुळे नुकसान भरपाईची आशा मावळत असल्याचे शेतकरी अविनाश गावडे म्हणाले. त्यामुळे पुढील पीके कशी घ्यावीत? अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी आहेत. किमान ७५ टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

३ एकर क्षेत्रात ३० क्विंटल सोयबीनचे उत्पन्न नेहमी मिळते. मात्र, या परतीच्या पावसामुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले असून शून्य उत्पादन मिळण्याची स्थिती आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी मंदाबाई घाडगे यांनी केली आहे.

दरवर्षी ३० ते ४० क्विंटल उत्पन्न मिळते. माञ, अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक भिजल्यामुळे निम्मे उत्पन्न मिळेल की नाही, अशी परिस्थिती आहे. पंचनामे झाले असून लवकरात लवकर मदत मिळण्याची आशा असल्याचे शेतकरी बबनराव घाडगे म्हणाले.

बारामती उपविभागातील अंतिम अहवाल -

  • तालुका बाधीत गावांची संख्या बाधीत शेतकरी संख्या पेरणी झालेले क्षेञ पंचनामे झालेले क्षेञ टक्केवारी
  1. बारामती ११७ २९१७३ १५७९८ १७२२८.३२ १००
  2. इंदापूर १४१ १४०३३ १०५९७ ७४३१.३७ १००
  3. दौंड ९८ १५५९४ १३९८७ ७९२२.०६ १००
  4. पुरंदर १०५ २३३२८ ३१७०६ १११४९.३७ १००
  5. एकूण ४६१ ८२१२८ ७२०८८ ४३७३१.१२ १००

Intro:Body:बारामती- विशेष स्टोरी

शेतकरी व्दिधा मनस्थितीत -

परतीच्या पावसाने शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान-

हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिसकावल्याने राज्यभरातील शेतकरी हवालदील झाला आहे. काढणीला आलेले व काढलेले पीक परतीच्या पावसाने पुन्हा शेतातच भिजल्याने शेतक-यांच्या काबाड कष्ठासह त्यांचे पीक वाया गेले आहे. बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंन्ड, पुरंदर या भागातील ८२ हजार १२८ शेतक-यांचे ४३ हजार ७३१ हेक्टर शेतीक्षेञ अवकाळी पावसाने बाधीत झाले आहे. सध्या पेरण्यांचा मोसम सुरु आहे. माञ शेतक-यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले. माञ अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

राज्याच्या राजकारणांची समीकरणे कशी आणि केव्हा जुळून येतील. हे कळायला मार्ग नाही. माञ अतिरिक्त पावसामुळे शेतक-यांच्या नाकीनऊ आले आहे. यंदाच्या या ओल्या दुष्काळाने शेतक-यांच्या हाता तोंडांशी आलेला घास हिरावून घेतल्याची परिस्थिती आहे.अशा परिस्थितीत राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असल्याने व त्यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शेतक-यांना नुकसान भरपाई केव्हा मिळेल याची शाश्वती नसल्याने अन्नदात्यांवर उपवास मारीची वेळ आली आहे. राज्यातील अनेक भागात सततची नापीकी आणि ओल्या दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, काही नुकसान ग्रस्त शेतकरी आत्महत्या करावी की, काय असे बोलवून दाखवत आहेत.

अवकाळी पावसाने नुकसान ग्रस्तशेतीचा आढावा घेण्यासाठी ईटीव्ही भारतने बारामती तालुक्यातील मळद गावातील शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. ५ हजार ६२८ लोकसंख्या असलेल्या या गावातील ६० टक्के नागरिक शेती करतात. सोयाबीन, मका, कडवळ, ऊस, वांगी, भेंडी यासारखी पीके घेतली जातात. माञ यावेळी पडलेल्या अवकाळी पावसाने राज्यासह येथील शेतक-यांना ही अडचणीत टाकले आहे. या भागात शेतक-यांनी घेतलेल्या ४० ते ५० एकर सोयबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढून ठेवलेलं सोयाबीन पावसाने भिजून पुन्हा त्याला कोंब फुटले आहे. १० टक्के ही सोयबीन पिकाचे उत्पादन होणार नसल्याचे सांगून, झालेल्या नुकसानीचे किमान ७५ टक्के मदत व्हावी अशी शेतक-यांकडून मागणी होत आहे.

...............................................................

मदतीची नुसतीच घोषणा-

अवकाळी पावसामुळे राज्यभरात झालेल्या शेतमालाच्या नुकसानी नतंर मुख्यमंञ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात १० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली. माञ सद्यस्थितीत या तरतुदीच्या रक्क्मेवर कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे १० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीची केवळ घोषणाच ठरली आहे.

...............................................................

बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या चार ही तालुक्यातील ज्वारी, बाजरी, कांदा, भाजीपाला, सोयाबीन, द्राक्ष, डाळिंब या पिकांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तालुका स्तरावरुन पंचनामे करुन एकञित अहवाल तयार करण्यात आला आहे. या चार तालुक्यातील ४६१ गावातील ८२ हजार शेतक-यांच्या ४३ हजार ७३१ शेती क्षेञाचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहे. अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात येणार असून, आलेली मदत शेतक-यांपर्यंत पोहचविणार आहे.

बालाजी ताटे- उपविभागीय कृषिअधिकारी बारामती.

...............................................................

शेतक-यांच्या प्रतिक्रिया-

१) पंचमाने करुन आठ दिवस झाले. अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. ४० ते ५० एकर सोयाबीन, तसेच १० एकर वांगी पीक पूर्ण पणे वाया गेले आहे. एकरी ४ लाखांचे उत्पन्न मिळत होते. माञ आत्ता निम्मही उत्पन्न मिळणार नाही. निकालानतंर अद्याप सरकार स्थापन न झाल्यामुळे नुकसान भरपाईची आशा मावळत असल्याची भावना असून पुढील पीके कशी घ्यावीत या व्दिधा मनस्थितीत आहोत.किमान ७५ टक्के नुकसान भरपाई मिळावी-

अविनाश गावडे, शेतकरी बारामती.

२) ३ एकर क्षेञात ३० क्विंटल सोयबीनचे उत्पन्न नेहमी मिळते. परंतू या परतीच्या पावसामुळे संर्पणू पिकांचे नुकसान झाले असून शून्य उत्पादन मिळण्याची स्थिती आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई दयावी.-

मंदाबाई घाडगे, शेतकरी मळद ता. बारामती

३) दरवर्षी ३० ते ४० क्विंटल उत्पन्न मिळते. माञ अवकाळी पावसामुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक भिजल्यामुळे निम्मही उत्पन्न मिळेल की नाही. अशी परिस्थिती आहे. पंचनामे झाले असून लवकरात लवकर मदत मिळण्याची आशा आहे.

बबनराव विठ्ठल घाडगे, शेतकरी भैय्यावस्ती बारामती.

बारामती उपविभागातील अंतिम अहवाल-

तालुका बाधीत गावांची संख्या, बाधीत शेतकरी संख्या, पेरणी झालेले क्षेञ, पंचनामे झालेले क्षेञ, टक्केवारी

१) बारामती ११७ २९१७३ १५७९८ १७२२८.३२ १००

२) इंदापूर १४१ १४०३३ १०५९७ ७४३१.३७ १००

३) दौंड ९८ १५५९४ १३९८७ ७९२२.०६ १००

४) पुरंदर १०५ २३३२८ ३१७०६ १११४९.३७ १००

एकूण ४६१ ८२१२८ ७२०८८.०० ४३७३१.१२ १००

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.