पुणे - पुरातन किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या 'शिवाजी ट्रेल' या संस्थेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, हडसर, चावंड, जीवधन, निमगिरी, सिंदोळा व नारायणगड या ७ किल्ल्यांवर दुर्ग पूजा केली गेली. गेल्या २२ वर्षांपासून ही मोहीम राबवण्यात येत असून या अभियानाची नोंद लिम्का बुकमध्ये झालेली आहे.
यावर्षी संस्थेने महाराष्ट्रातील १४० किल्यांवर दुर्ग पूजन केले आहे. दुर्ग संवर्धनाकडे एक पाऊल टाकत १९९७ साली 'शिवाजी ट्रेल' या संस्थेने रायगडपासून दुर्ग पूजेच्या उपक्रमास सुरुवात केली. या कार्याला २३ वर्ष पूर्ण झाली आहेत. या उपक्रमातून किल्ल्यांची साफ-सफाई, भिंती साफ करणे व पाण्याच्या टाक्या कचरामुक्त करण्यासारखी कामे करण्यात येतात. किल्यांचे प्रत्यक्षात संवर्धन व किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्या गाळमुक्त, कठडे, रेलींग येण्या-जाण्याच्या रस्ता, पायऱ्या बांधणे, किल्ल्यावर ध्वज स्तंभ अशी एक ना अनेक कामे करणारी शिवाजी ट्रेल ही पहिलीच संस्था म्हणून नावारुपाला आली आहे.
हेही वाचा - अबब...! दुचाकीस्वाराने 108 वेळा भंग केले वाहतूकीचे नियम 'इतका' भरला दंड
सन २०१४ नंतर दरवर्षी एका किल्ल्यावरचे गड पूजन, दुर्ग पूजा हा उपक्रम किल्ल्यांवर सुरू करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ८० किल्ले नंतर १२१, १२५, १३१ आता हा आकडे जवापास १५० किल्ल्यांवर पोहचला आहे. हा दुर्ग पूजेचा उपक्रम भारताबाहेर पण गेला असून दरवर्षी वेगवेगळ्या ४ ते ६ किल्ल्यांवर पूजा झाल्या आहे. 'शिवाजी ट्रेल' या संस्थेच्या या उपक्रमात २१ सरदार घराणीही सहभागी होत आहेत.
हेही वाचा - कात्रज चौकात चालकाविना धावली पीएमपी, सुदैवाने जीवितहानी नाही