पुणे Diwali २०२३ : येत्या 10 नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. दिवाळीत फटाके फोडू नये, असं आवाहन करण्यात येते. तरी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात फटाके फोडतात. हिच बाब लक्षात घेता पुण्यातील 'मूर्तीज बेकरी'च्यावतीनं (Murthys Bakery Pune) गेल्या 10 वर्षांपासून चॉकलेटचे फटाके बनवले (Chocolate Crackers Chocolate Faral) जातात.
पंतप्रधान कार्यालयाला पाठवणार फटाके अन् चॉकलेट : सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने सजली आहेत. फटाक्यांपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. फटाक्यामुळं अनेक दुर्घटनाही घडल्या आहेत. फटाके फोडणाऱ्या बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी बाजारात चॉकलेटचे फटाके आलेत. या चॉकलेटच्या फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून, नागरिकांकडून गिफ्ट देण्यासाठी देखील याचा वापर केला जातोय. गेली अनेक वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यावरणाचा संदेश देतायेत. त्यामुळं यंदा 'मूर्तीज बेकरी'च्या वतीने पंतप्रधान कार्यालयाला देखील हे चॉकलेटचे फटाके पाठवण्यात येणार आहेत.
चॉकलेटचे फटाके अन् फराळही : लक्ष्मी बॉम्ब, चक्र, फुलबाजा, रॉकेट, फ्लॉवर पॉट, गोलबॉम्ब, लाड फटाका,चौकोनी बॉम्ब, सुतळी बॉम्ब, छोटा बॉम्ब अशा 11 प्रकारचे चॉकलेट फटाके तयार करण्यात आलेत. फराळमध्येही चॉकलेट काजू, चॉकलेट लाडू, चॉकलेट बदाम, चॉकलेट शेव, चॉकलेट चकली, चॉकलेट करंजी बनवण्यात आलेत. यात विशेष बाब म्हणजे चॉकलेटचा किल्लादेखील बनवण्यात आलाय.
किंमतींमध्येही वाढ : महागाईचा फटका या चॉकलेट फटाक्यांना देखील बसलाय. चॉकलेट फटाके आणि चॉकलेटच्या फराळांच्या किंमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. एका गिफ्ट पॅकमागे 100 रुपये एवढी वाढ झाली आहे. यात विशेष बाब म्हणजे चॉकलेटचा किल्लादेखील बनवण्यात आलेला आहे, अशी माहिती यावेळी 'मूर्तीज बेकरी'चे विक्रम मूर्ती यांनी दिली.
हेही वाचा -