पुणे: या सगळ्या नाराजी नाट्याचा स्पष्ट शब्दांमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नकार दिला असून, नाराज असल्याचे मला माहितीच नसल्याचे म्हटले आहे. माहिती असते तर मी त्यांना सांगितले असते, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. कसबा पोटनिवडणुकीत प्रचार करताना चंद्रकांत पाटील यांनी 'हू इज धंगेकर' असे म्हणून त्यांना हिणवले होते. त्यानंतर ते प्रचंड व्हायरल झाले. यावरून पाटील यांच्यावर टीकाही झाली होती. धंगेकर आमदार झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत चंद्रकात पाटील आणि त्यांच्यात नाराजी नाट्य झळकले.
जेवायला बोलावले तर जाईल: महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामुळे पुण्याच्या प्रश्नांचा अधिवेशन काळात आढावा घेता आला नाही. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील, मेट्रो, जायका प्रकल्प, पुण्यातील रस्ते, पुण्यातील उड्डाणपूल याची माहिती देण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. चंद्रकांत पाटील म्हणाले की, धंगेकर यांनी प्रश्न उपस्थित केले असते, तर मी त्यांना उत्तर दिले असते. ते माजी सभाग्रह नेता असल्यामुळे त्यांच्याच काळात जायका मेट्रोसारखे प्रकल्प शहरात राबवण्याचे काम सुरू झाले होते. त्यामुळे ते थोडेसे बोलले; परंतु मला ते नाराज होऊन बाहेर गेले हे माहितीच नव्हते. ते जर मला माहिती असते तर मी त्यांची नाराजी दूर केली असती. आता धंगेकरांनी मला घरी जेवायला बोलावले तर मी जेवायलासुद्धा जाईल असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
15 मे पर्यंत पुणेकरांना प्रतीक्षा: पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या शहरातील कामांचा आढावा घेतला. पुणेकरांना 31 मार्चपर्यंत रुबी हॉलपर्यंत हा मार्ग सुरू करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्यात खूप मोठ्या तांत्रिक अडचणी आल्यामुळे आता 15 मे पर्यंत पुणेकरांना याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत काम पूर्ण होईल अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मेट्रोच्या पुढच्या प्रवासाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्याचा उपयोग चांगला करता येईल, असेसुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा: Bridge Work Mumbai : रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे आर्मीची मेहनत वाया, खर्चही गेला फुकट, वाचा सविस्तर