ETV Bharat / state

बागेश्वर महाराजांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, अंनिसच्या प्रश्नावर म्हणाले, हनुमानजींच्या नावावर चमत्कार झाला तर रोखू शकत नाही - Dhirendra Shastri

Dhirendra Shastri: मराठा आरक्षणावर पंडित धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार (Dhirendra Shastri Pune PC) यांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाचं यश, शौर्य आणि वीरता याचं योगदान या देशासाठी राहिलं आहे. (Dhirendra Shastri program in Pune) म्हणून मी मराठा समाजाच्या बरोबर आहे आणि सरकारनं जे यथावकाश आहे ते मान्य केलं पाहिजे. (Maratha reservation issue) हिंदू राष्ट्रात ना मुस्लिमांना पळण्याची गरज आहे ना ख्रिश्चनांना असाही उल्लेख त्यांनी केला.

Dhirendra Shastri
धीरेंद्र शास्त्री
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 7:09 PM IST

मराठा आरक्षण आणि हिंदू राष्ट्राविषयी बोलताना धीरेंद्र शास्त्री

पुणे Dhirendra Shastri : जगदीश मुळीक फाउंडेशनतर्फे बागेश्वर महाराज सरकार यांची तीन श्री हनुमान कथा व महादिव्य दरबारचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे. आज याचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी बागेश्वर महाराज यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. (Dhirendra Shastri On Maratha Reservation) यावेळी बागेश्वर महाराज म्हणाले की, जी सांस्कृतिक राजधानी म्हटली जाते त्या पुण्यनगरीत तीन दिवस श्री हनुमान कथा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमात मी भारतीय संस्कृती आणि सनातन याबाबत जागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सनातनच्या एकतेसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच मी काहीही वेगळं करत नाहीये. जी आपली संस्कृती आहे तिची पुनर्स्थापना व्हावी आणि सर्वजण कसे एकत्र येतील यासाठी प्रयत्न करणार आहे. (Dhirendra Shastri on Hindu Rashtra)

तर तुकाराम महाराजांच्या समाधीस्थळी जाणार: मध्यंतरी बागेश्वर महाराज यांनी संत तुकाराम महाराजांविषयी जे विधान केलं होतं त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, मी संतांना नेहमी भगवान सारखं मानत असतो आणि त्यांच्या प्रती नेहमी मला आदर असतो. कोणीही संतांचा विरोध करू शकत नाही. संत तुकाराम महाराज यांच्या बाबतीत एका पुस्तकात जो लेख मिळाला होता त्यात आपापल्या बोलण्याच्या शैलीप्रमाणे मी देखील बुंदेलखंडी शैलीत सांगितलं आणि यामुळे काहीजण विरोध करू लागले; पण मी याबाबत तेव्हाही माफी मागितली होती आणि आताही माफी मागत आहे. मला जसा वेळ मिळेल तसा मी त्यांच्या देहू येथील समाधी स्थळी देखील जाणार असल्याचं यावेळी बागेश्वर महाराज यांनी सांगितलं.

त्यांचं वर्णन शास्त्रात नाही: साईबाबा यांच्या बाबतीत विचारलं असता ते म्हणाले की, त्यांच्या बाबतीत मी कोणतीही टिप्पणी केलेली नाही. लोक आपापल्या पद्धतीनं अर्थ काढत असतात. मला एकाने प्रश्न केला होता की, ते भगवान आहे का? तर मी त्यांना असं म्हटलं होतं की, आमच्या धर्मग्रंथात त्यांचा अवतार नाही. संत हे भगवानच्या समान असतात. जो तो आपल्या आस्थेनं गुरूला भगवान मानू शकतो. साई बाबांना जे कोणी भगवान मानत असेल ती त्यांची आस्था आहे; पण शास्त्रात आम्हाला त्यांचं वर्णन कुठेही मिळालेलं नाही.

विरोध तर होणारच: पुण्यात देखील पंडित धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाला विरोध होत आहे. याबाबत ते म्हणाले की, विरोध तर होणारच. विरोध करणाऱ्यांना कोणीही थांबविलेलं नाही. रामजींना देखील विरोध झाला होता. मी तर सामान्य आहे. जे विरोध करत आहे त्यांना सेम टू यू असं यावेळी बागेश्वर महाराज म्हणाले. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होत असतं. मी कोणाचाही विरोध केलेला नाही. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना आवाहन आहे की, त्यांनी माझ्या जवळ यावं आणि जे 'दूध का दूध' आहे ते करावं.

आम्ही देखील संविधानाला मानतो: हिंदू राष्ट्राबाबत बागेश्वर महाराज म्हणाले की, आमच्या पूर्वजांनी संविधान स्वीकारलं आहे. आम्ही देखील संविधानाला मानतो आणि त्याच संविधानाचं 125 वेळा संशोधन झालं आहे. एकदा हिंदू राष्ट्रासाठी झालं तर त्यात वाईट काय आहे. लोकांच्या मनात आहे की, हिंदूराष्ट्र व्हायला पाहिजे आणि जेव्हा तसं होईल तेव्हा संविधानात देखील होईल, असा विश्वास यावेळी बागेश्वर महाराजांनी व्यक्त केला.

ना मुस्लिम पळतील ना ख्रिश्चन: हिंदू राष्ट्र झाल्यास विविध धर्मातील लोकांनी कुठे जायचं याबाबत बागेश्वर महाराज यांना विचारलं असता ते म्हणाले की, त्यांना कुठेही पळून जायची गरज नाही. रामराज्यांना मुसलमानांला पळून घ्यायची गरज आहे ना ख्रिश्चनांना पळून जायची. रामराज्यात सर्वच मिळून राहतात आणि हेच त्यांना समजून सांगायचं आहे. रामराज्य म्हणजे सामाजिक समरसता आणि हिंदू राष्ट्राचा अर्थ की, तुम्ही आमच्या रामाच्या यात्रेत दगड फेकू शकत नाही. हिंदू राष्ट्राचा अर्थ असा की, पालघर येथे संतांबरोबर अत्याचार झाला ते तुम्ही करू शकणार नाही.

हेही वाचा:

  1. धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला पुण्यात विरोध; अजित पवार गट, अंनिस मैदानात
  2. Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्रींना अंनिसचं आव्हान, चमत्कार सिद्ध केल्यास तीस लाखांचं बक्षीस
  3. Bageshwar Baba : बागेश्वर बाबांच्या दरबारात चेंगराचेंगरी ; 10 जखमी, अनेक महिला बेशुद्ध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.