ETV Bharat / state

प्रचारासाठी डोनाल्ड ट्रंप यांना बोलावले तरी, अमोल कोल्हेच विजयी होणार - धनंजय मुंडे

शिरुर लोकसभा मतदारसंघात विरोधकांना आता धडकी भरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारासाठी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तुम्ही प्रचारासाठी डोनाल्ड ट्रम्पला जरी बोलावले तरी, आमचा अमोल कोल्हे विजयी होणार असल्याचा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी व्यक्त केला.

author img

By

Published : Apr 25, 2019, 12:05 PM IST

धनंजय मुंडेंचा युतीवर निशाणा

पुणे - शिरुर लोकसभा मतदारसंघात विरोधकांना आता धडकी भरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही प्रचारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जरी बोलावले तरी, आमचा अमोल कोल्हे विजयी होणार असल्याचा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी व्यक्त केला.

महाआघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आळंदीत आयोजीत करण्यात आलेल्या सभेत मुंडे बोलत होते. पंतप्रधान दिवसाआड राज्यात प्रचारसभा घेत आहेत. पवारसाहेबांवर टीका करत आहेत. शिरूर मतदारसंघात तर इतकी धडकी भरली आहे की, ७-८ मंत्र्यांची सभेसाठी रीघ लागली आहे.

शिवसेनेने शिवरायांच्या जन्मस्थळाचा विकास का केला नाही?

छत्रपती शिवाजी महाराजंच्या नावे शिवसेनेची स्थापना झाली. पण त्यांना शिवरायांच्या जन्मस्थळाचा विकास करता आला नाही? आढळरावांनी माऊलींची शपथ घेऊन या भागात पाणी आणण्याचे आश्वासन दिले होते. आजही माझ्या भगिनी पाण्यासाठी वणवण फिरतात. माऊलींची खोटी शपथ घेताना यांना लाज कशी वाटत नाही? असे म्हणत मुंडेंनी सेनेवर निशाणा साधला.

गेल्या १५ वर्षात आढळराव 'आढळलेच' नाहीत

गेली १५ वर्षे येथील शिवसेनेचे खासदार कधी 'आढळलेच' नाहीत. या भागात छत्रपतींची शिवनेरी आहे, शंभूराजांची समाधी आहे, भिमा-कोरेगाव आहे. पण या प्रेरणास्थळांचा विकासही त्यांना करता आला नाही. या संतांच्या भूमीची परंपरा यांना जपता आली नसल्याचे मुंडे म्हणाले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.