बारामती - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांनी काल (शनिवारी) आपल्या भाषणात राज्यातील विविध नेत्यांवर जोरदार टीका केली. त्या पहाटेच्या शपथविधीवरुन राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिमिक्री करत टीका केली. यावर प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना टीके शिवाय व नकला करण्याशिवाय काही जमत नाही. एकेकाळी 14 आमदार असणाऱ्या राज ठाकरेंनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. हे आमदार आपल्याला सोडून का गेले?, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले. ते इंदापूर येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.
'शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे' : लोकसभा निवडणुकांवेळी राज ठाकरे यांनी आत्ताच्या केंद्र सरकार विरोधात भूमिका घेतली होती. आत्ता कालच्या सभेमध्ये कोणती भूमिका घेतली आहे, आपण सर्वांनी पाहिले आहे. सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या राज ठाकरे यांनी विश्वासाहर्ता गमावली आहे. एकेकाळी पुणे, नाशिकमध्ये त्यांचे आमदार निवडून आले होते. पवार साहेबांची मुलाखत घेताना हेच राज ठाकरे यांची तोंडभरून स्तुती करतात. त्यावेळी यांना पवार साहेब जातीवादी वाटले नाहीत. त्यामुळे असा कोणता चमत्कार झाला, की अचानक त्यांना आज पवार साहेब जातीवादी वाटू लागले. 1962 पासून पवार साहेब देशाच्या राजकारणात आहेत. त्यावेळी यांचा जन्म देखील झाला नव्हता. आता पवार साहेबांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्या सारखे आहे. राज ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती. नकलाकार म्हणूनच त्यांच्याकडे राजकारणात पाहिले जात आहे. नकला करून महाराष्ट्रातील प्रश्न संपणार नाहीत. सभेमध्ये राज ठाकरे केवळ उपस्थितांना हसवण्याचे काम करतात. गंभीरपणे कोणते मुद्दे मांडत नाहीत, अशा शब्दात टीकाही अजित पवारांनी केली आहे.
हेही वाचा - 'राज ठाकरे हे तर पुष्पातले फुसके फ्लॉवर'; शरद पवारांवरील टीकेला रुपाली पाटलांकडून प्रत्युत्तर