पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली होती. त्यांना पुणे सत्र न्यायालयाने 1 जून पर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. यावेळी पुनाळेकर यांनी कायद्यातील काही महत्त्वाच्या तरतुदींचा दाखला देत आपल्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही, असा दावा न्यायालयात केला आहे.
त्याप्रमाणेच किमान 10 वकिलांना भेटण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणीही यावेळी बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, सीबीआयने पुनाळेकर यांच्या दाव्याला विरोध केला होता.