ETV Bharat / state

नागरिकांना निगडीत क्वारंटाईन करण्यास नगरसेवकांचा विरोध; पोलिसांनी घेतले ताब्यात - नागरिकांना निगडीत क्वारंटाईन करण्यास विरोध

आनंदनगर परिसरातील 14 जणांना निगडी परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु, आणखी व्यक्तींना तिथे क्वारंटाईन करण्यास नगरसेवक राजू मिसाळ यांनी विरोध केला. त्या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलनही केले.

Corporators oppose to quarantine citizens
नागरिकांना क्वारंटाईन करण्यास नगरसेवकांचा विरोध
author img

By

Published : May 28, 2020, 1:20 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चिंचवडमधील आनंदनगर परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. या परिसरातील नागरिकांना निगडी प्राधिकरण येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु, स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, माजी महापौर आर.एस.कुमार यांनी त्याला विरोध केला. याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आनंदनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यानुसार तेथील शेकडो नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. आनंदनगर परिसरातील 14 जणांना निगडी परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु, आणखी व्यक्तींना तिथे क्वारंटाईन करण्यास नगरसेवक राजू मिसाळ यांनी विरोध केला. संबंधित ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलनही केले. महाविद्यालयात जाऊन मिसाळ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. संचारबंदी असल्याचेही सांगितले. मात्र, त्यांनी न ऐकल्याने अखेर त्यांच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात आले.

अर्धा तास पोलीस चौकीत बसवून सर्वांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर, नगरसेवक राजू मिसाळ म्हणाले, आनंदनगर परिसरातील काही नागरिकांना निगडी येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच कोणालाही प्रशासनाने विश्वासात घेतले नाही. प्राधिकरण परिसरतील ज्येष्ठ नागरिक घाबरलेले आहेत. त्यामुळे, आम्ही यास विरोध करत आहोत, असे मिसाळ यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.