ETV Bharat / state

तृप्ती देसाईंना धमकावल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल - बच्चू कडू बातमी

बच्चू कडू यांनी फोनवरून धमकी दिल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

तृप्ती देसाई आणि बच्चू कडू
author img

By

Published : Nov 2, 2019, 12:21 PM IST

पुणे - अचलपूर मतदारसंघातील आमदार बच्चू कडू यांच्यावर पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चू कडू यांनी फोनवरून धमकी दिल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीवरुन बच्चू कडू यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

police
तृप्ती देसाईंनी सहकार नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली

काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाईंनी बच्चू कडू यांच्या विरोधात फेसबुकवर एक पोस्ट लिहली होती. शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे बच्चू कडू शिवसेना आणि भाजपविरोधात आंदोलन का करत नाहीत? विदर्भात शेतकरी अडचणीत आहे" असा सवाल देसाई यांनी फेसबुक पोस्टद्वारे विचारला होता. यावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ, बदनामीकारक टिप्पणी करून मानसिक त्रास होईल अशा कमेंट्स केल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.

desai
तृप्ती देसाईंनी लिहलेली फेसबुक पोस्ट

या घटनेनंतर बच्चू कडू यांनी धमकी दिल्याचे देसाई यांनी सांगितले.तुम्ही मला फेसबुकवर उपदेश करू नका, स्वतःला मोठे समजू नका, शहाणपणा करू नका, अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी महिला आणि सामाजिक प्रश्नांना घेऊन आंदोलने केले आहे.

Intro:(बचू कडू, तृप्ती देसाई यांचे फोटो वापरावे)
तृप्ती देसाईंना धमकावल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यावर पुण्यात अदखलपात्र गुन्हा

अचलपूर मतदार संघातील आमदार बच्चू कडू यांच्यावर पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चू कडू यांनी फोनवरून धमकी दिल्याचे सांगत तृप्ती देसाईंनी
याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Body:काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाईंनी आपल्या फेसबुकद्वारे स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे बच्चू कडू शिवसेना आणि भाजपविरोधात आंदोलन का करत नाहीत? विदर्भात शेतकरी अडचणीत आहे" असा सवाल विचारणारी पोस्ट टाकली होती.यावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ, बदनामीकारक टिप्पणी करून मानसिक त्रास होईल अशा कमेंट्स केल्याचे तृप्ती देसाई यांनी कडू यांना फोन करून सांगितले.
Conclusion:त्यानंतर बच्चू कडू यांनी तुम्ही मला फेसबुकवर उपदेश करू नका, स्वतःला मोठे समजू नका, शहाणपणा करू नका, अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी दिल्याबाबत हा गुन्हा दाखल केला असल्याचे देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या रूढी व परंपरा तसेच स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी अनेक आंदोलने केली आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.