ETV Bharat / state

चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ब्राह्मण समाज आक्रमक, आंदोलनाचा इशारा - ब्राह्मण समाजाकडून भाजपचा निषेध पुणे

कोकणातली स्थानिक मुस्लिम हे गाडगीळ किंवा दाते होते, कोणीतरी आक्रमण केल्याने ते मुस्लिम झाले असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे.

चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ब्राह्मण समाज आक्रमक

author img

By

Published : Jan 8, 2021, 4:49 PM IST

पुणे- कोकणातली स्थानिक मुस्लिम हे गाडगीळ किंवा दाते होते, कोणीतरी आक्रमण केल्याने ते मुस्लिम झाले असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या वतीने चंद्रकांत पाटलांचा निषेध करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत समाजाच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला.

चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ब्राह्मण समाज आक्रमक

...तर ब्राह्मण महासंघाच्या वतीने आंदोलन

यावेळी बोलताना ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, भारतातील मुस्लीम हे पूर्वाश्रमीचे हिंदू आहेत हे मुस्लिम नेतेही मान्य करतात. असे असताना चंद्रकांत पाटील यांनी भारतातील मुस्लिम हे ब्राह्मणच आहेत असे सांगण्याचे काहीच कारण नव्हते. चंद्रकांत पाटलांनी काही आडनावे घेऊन हे जे विधान केले त्याचा आम्ही निषेध करतो. भाजप आणि चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या या विधानाचा अर्थ स्पष्ट करावा. येत्या दोन दिवसांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर, भाजप कार्यालयासमोर आणि चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर ब्राह्मण महासंघातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी आनंद दवे यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.