ETV Bharat / state

महिलांना एक दिवस नव्हे तर वर्षभर सन्मान मिळाला पाहिजे - तृप्ती देसाई - जागतिक महिला दिन तृप्ती देसाई पुणे

अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून महिलांचा सन्मान केला जातो. पण खरोखरच महिला सशक्तीकरण झाले आहे का? महिलांना मान सन्मान मिळतोय का? महिला राज्यात सुरक्षित आहेत का? आज महिला दिनाच्या निमित्ताने हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई
पुणे
author img

By

Published : Mar 7, 2021, 5:25 PM IST

पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून महिलांचा सन्मान केला जातो. पण खरोखरच महिला सशक्तीकरण झाले आहे का? महिलांना मान सन्मान मिळतोय का? महिला राज्यात सुरक्षित आहेत का? आज महिला दिनाच्या निमित्ताने हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला.

पुणे

उद्या जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महिला सक्षमीकरण, महिलांना मिळणारा मान-सन्मान यावर भाष्य करत सद्य स्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. जागतिक महिलादिनी विविध कार्यक्रम घेऊन महिलांना सन्मान मिळाला पाहिजे, अशा घोषणा दिल्या जातात. पण सध्या पूजा चव्हाण प्रकरण असेल हिंगणघाटचे प्रकरण असेल किंवा चार वर्षांपूर्वी झालेले कोपर्डीचे प्रकरण असेल, अशा प्रकरणांमध्ये ज्या निर्भया आहेत त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. यात जे दोषी आहेत त्यांना फाशी झालेली नाही आणि महिला सशक्तीकरण करू म्हणत महिला दिन साजरा केला जातो. तेव्हा एक दिवस महिलांसाठी साजरा करण्याची गरज नव्हे तर वर्षभर महिलांना सन्मान दिला पाहिजे, असे मत यावेळी तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

राज्यात महिला आयोगाला अध्यक्षा नाही हेच दुर्दैव

राज्यात महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. पण, आत्तापर्यंत महिला आयोगाला अध्यक्ष मिळालेला नाही, हे या राज्यासाठी दुर्दैवी आहे. टाळेबंदीच्या काळात महिला अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, तेव्हा वाटले होते की अध्यक्ष मिळेल पण तेव्हाही अध्यक्ष नेमण्यात आले नाही. सरकारला महिला सुरक्षेशी काहीही घेणे देणे नाही. महिला सुरक्षा सरकारने वाऱ्यावर सोडली आहे. सरकारने महिला आयोगाची अध्यक्ष नेमताना ती कुठल्याही पक्षाची न नेमता सामाजिक काम करण्याऱ्या महिलेची नेमणूक करावी, अशी मागणीही यावेळी तृप्ती देसाई यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.