पुणे- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या 25 हजार कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालय (ईडीने) मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी बारामतीत कडकडीत बंद ठेवण्यात आला.
हे ही वाचा - माझ्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असेल तर त्याचे स्वागत - पवार
ईडीच्या माध्यमातून जे केले जाते ते अत्यंत दुर्दैवी - हेमंत टकले
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने(ईडी) ने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सुडापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी बारामतीत कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला स्थानिकांनी बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रयत शिक्षण संस्थेसह अन्य महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. सकाळ पासूनच शहरात सामसुम आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी सकाळी दहा वाजता शारदा प्रतिष्ठानच्या आवारात नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार
शिखर बँक घोटाळा: ईडीकडून शरद पवार, अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल