ETV Bharat / state

कौतुकास्पद! प्रवाशाचे लाखोंचे दागिने रिक्षाचालक भरतने केले परत - nigadi

प्रवाशाकडून रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने प्रामाणिक रिक्षा चालकाने मूळ मालकाला परत केले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. भरत जाधव, असे प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव आहे. तर मंगल ढेरे असे दागिने परत केलेल्या मूळ मालकिणीचे नाव आहे.

दागिने परत केल्यानंतर आनंद व्यक्त करताना
author img

By

Published : Sep 8, 2019, 12:55 PM IST

Updated : Sep 8, 2019, 2:26 PM IST

पुणे - रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने प्रामाणिक रिक्षा चालकाने मूळ मालकाला परत केले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. भरत जाधव, असे प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव आहे. तर मंगल ढेरे, असे दागिने परत केलेल्या मूळ मालकिणीचे नाव आहे.

प्रवाशाचे लाखोंचे दागिने रिक्षाचालक भरतने केले परत

मंगल ढेरे या शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या दिराच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या होत्या. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या चिंचवड येथून रिक्षातून आकुर्डी रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास केला. तेथून त्या रेल्वेने पुण्याला जाणार होत्या. आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ उतरल्यानंतर त्यांनी त्यांची साडेपाच तोळ्याचे सोन्याचे गंठण असलेली बॅग रिक्षातच विसरली. ही बाबा मंगल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रिक्षाचा शोध घेतला. मात्र, रिक्षा निघून गेली होती. त्यानंतर त्यांनी लागलीच निगडी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलीस तपास करू लागले.

दरम्यान, रिक्षा चालक नेहमीप्रमाणे प्रवासी वाहतूक करत होता. मंगल यांना सोडल्यानंतर त्यांनी अनेक प्रवाशांची वाहतूक करत रात्री घरी गेले. रात्रभर ती बॅग रिक्षाच्या मागील बाजूसच होती. रिक्षाचालक भरत हे सकाळी उठल्यानंतर परिवारासह दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यायला गेले. दर्शन झाल्यानंतर त्यांच्या मुलाच्या नजरेस ती बॅग पडली. त्याने लागलीच ही बाब भरत यांच्या लक्षात आणून दिली. भरत यांनी बॅगची तपासणी केली असता त्यात सोन्याचे दागिने दिसले. त्यानंतर त्यांनी चिंचवड पोलीस ठाणे गाठत याची माहिती पोलिसांना दिली. याच बॅगचा शोध निगडी पोलीस घेत असल्याचे चिंचवड पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी निगडी पोलिसांच्या मदतीने मंगल यांच्याशी संपर्क करून चिंचवड पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर प्रामाणिक भरत जाधव यांच्यासमक्ष सोन्याचे दागिने असलेली बॅग मंगल ढेरे यांना परत दिली. रिक्षाचालकाच्या या प्रामाणिकपणाचे कौतूक करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन भरत जाधव यांचा सन्मान करण्यात आला. मंगल ढेरे यांनीही रिक्षाचालकाचे आभार मानले.

Intro:mh_pun_02_riksha_special_story_mhc10002Body:mh_pun_02_riksha_special_story_mhc10002

Anchor:- रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने प्रामाणिक रिक्षा चालकाने मूळ मालकाला परत केले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. भरत जाधव असे प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव आहे. तर मंगल ढेरे असे दागिने परत केलेल्या मूळ मालकिणीचे नाव आहे. भरत यांच्या रिक्षात साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने राहिले होते. ही बाब मंगल यांच्या लक्ष्यात आली मात्र तोपर्यंत रिक्षा चालक हे निघून गेले होते. याप्रकरणी मंगल यांनी निगडी पोलिसात तक्रार नोंदवली होती. दरम्यान, चिंचवड पोलिसांनी रिक्षाचालक भरत यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले असून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मंगल विश्वास ढेरे या शुक्रवारी सायंकाळी दिराच्या वाढदिवस निमित्त शिरूर येथील पिंपरी-चिंचवड शहरात आल्या होत्या. वाढदिवस झाल्यानंतर त्या परत पुण्यात जाणार होत्या. तेव्हा, त्यांनी चिंचवड येथून रिक्षातून आकुर्डी रेल्वे स्थानका पर्यंत प्रवास केला. याच दरम्यान, साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरल्या. ही बाब त्यांच्या लक्षात आली मात्र तोपर्यंत रिक्षा चालक भरत हे निघून गेले होते. रिक्षाचा काही वेळ शोध घेण्यात आला मात्र ते सापडले नाहीत. संबंधित घटनेची तक्रार निगडी पोलिसात देण्यात आली. दरम्यान, रिक्षा चालक भरत जाधव हे भाडे करून घरी गेले. रात्रभर सोन्याची दागिने असलेली बॅग रिक्षातच होती. दरम्यान, आज सकाळी रिक्षा चालक भरत हे आपल्या कुटुंबासह पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा, त्यांच्या मुलाला रिक्षातील बॅग दिसली, ही बाब त्याने आपल्या वडिलांच्या लक्ष्यात आणून दिली. भरत यांनी बॅग पाहून त्यात काय आहे हे पहिले असता त्यात सोन्याचे दागिने दिसले. त्यांनी काही विचार न करता संबंधित बॅग घेऊन चिंचवड पोलीस ठाणे गाठले. संबंधित घटनेची माहिती दिली. निगडी पोलिसात तक्रार दाखल असल्याने मंगल यांच्याशी संपर्क करणे शक्य झाले. मंगल याना तातडीने चिंचवड पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि प्रामाणिक रिक्षा चालक भरत यांनी पोलिसांच्या समक्ष साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने दिले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन रिक्षा चालक यांचा सन्मान करण्यात आला. 

बाईट:- मंगल ढेरे- दागिने हरवलेली महिला
बाईट:- भरत जाधव- प्रामाणिक रिक्षा चालक
बाईट:- भीमराव शिंगाडे- वरिष्ठ पोलीस निरीक्षक 

Conclusion:
Last Updated : Sep 8, 2019, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.