ETV Bharat / state

लॉक डाऊनमुळे बारामती बाजार समितीत भुसार मालाचे लिलाव बंद; कोट्यवधींचा व्यवहार ठप्प

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ्वड्यातील सोमवार व गुरुवारी भुसार बाजारात ३५०० ते ५००० पोत्यांची आवक होत होती. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी असल्याने ही उलाढाल ठप्प झाली असून एक ते सव्वा कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे. तसेच फळे व भाजीपाल्यांची आवकदेखील घटली आहे.

author img

By

Published : Apr 5, 2020, 10:52 AM IST

बारामती बाजार समिती
बारामती बाजार समिती

पुणे - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. २४ मार्चपासून सुरू असणाऱ्या लॉक डाऊन दरम्यान बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार मालाचे लिलावही बंद आहेत. यामुळे, आठ्वड्याला एक ते सव्वा कोटी रुपयांची होणारी उलाढाल निव्वळ ठप्प झाली आहे.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ्वड्यातील सोमवार व गुरुवार रोजी भुसार बाजारात ३५०० ते ५००० पोत्यांची आवक होत होती. त्यातून सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी असल्याने ही उलाढाल ठप्प झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली. तसेच फळे व भाजीपाल्यांची आवकदेखील घटली आहे.

जळोची येथील उपबाजार आवारात फळे व भाजीपाल्यांची सरासरी १२५ ते १५० गाड्यांमधून होणारी आवक कोरोनामुळे कमी झाली असून केवळ ४० ते ५० वाहनांतून शेतमालाची आवक होत आहे. बाजार आवारात १ हजार ते १२०० शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल, मापाडी, कर्मचारी यांचा वावर असतो. मात्र, लॉक डाऊन असल्याने शेतकरी आपल्या परीने बाजारात माल आणून स्वता शेतमालाची विक्री करत आहेत. तसेच काही शेतकरी किरकोळ व्यापाऱ्यांना आपला माल विकत असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्राहकांनी फळे-भाजीपाला खरेदी करताना गर्दी करू नये. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. भाजीपाल्याची कमतरता नाही, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे व उपसभापती बाळा सोपमणे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.