ETV Bharat / state

ईव्हीएममध्ये नव्हे तुझ्या बोटातच घोळ आहे - अजित पवार

भाजप पक्ष हा केवळ बोलघेवड्यासारखा बोलत असतो. 5 वर्षांपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. प्रत्यक्षात मात्र स्वप्न साकार झाली नाहीत, अशी भाजपवर टीका अजित पवारांनी केली.

author img

By

Published : Oct 15, 2019, 4:39 PM IST

अजित पवार

पुणे - विरोधकांची बटणे दाबू नका, असे आम्ही घसा कोरडा करुन सांगतोय. मात्र, तुझ्या बोटातच घोटाळा आहे. तुझे बोटच तिकडे जाते अन् नंतर ईव्हीएममध्ये घोटाळा आहे, असे म्हणतात, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते

यावेळी अजित पवार म्हणाले, सत्ताधारी हे सभेच्या अगोदरच आंदोलकांना बसवतात. यावर कार्यकर्त्यांनी ही 'हिट्लरशाही' असे म्हटले. त्यानंतर पवार म्हणाले, हुकूमशाही आहे, हिटलरशाही आहे. राज्यात तेच चालले आहे. काय म्हणायचे आहे म्हणा, फक्त विरोधकांचे बटण दाबू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

हेही वाचा - राष्ट्रवादीचा जुना पैलवान भाजपच्या तालमीत, माजी आमदार बापू पठारे भाजपात

भाजप पक्ष हा केवळ बोलघेवड्यासारखा बोलत असतो. 5 वर्षांपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. प्रत्यक्षात मात्र स्वप्न साकार झाली नाहीत. भाजपच्या 22 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहेत. त्याचे पुरावेही दिले होते. तरीहि अनेकांना क्लीनचिट दिली गेली असल्याचे पवार यांनी सांगितले.

एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, दिलीप कांबळे, प्रकाश मेहता यांना तिकीट का नाकारले? हे नागरिकांना कळू द्या. तुमचा कारभार एवढा चांगला होता तर यांना का तिकीट नाही दिल? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - ज्यांचे 'घड्याळ' बंद पडले त्यांना वेळेचे महत्व काय कळणार; स्मृती इराणींचा राष्ट्रवादीवर निशाणा

Intro:mh_pun_02_ajit_pawar_av_mhc10002Body:mh_pun_02_ajit_pawar_av_mhc10002

Anchor:- अजित पवार हे सडेतोड बोलण्यासाठी परिचित आहेत. त्यांची अनेक भाषण त्यांनी गाजवलेली आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ते बोलत असताना खाली बसलेल्या एका व्यक्तीची अजित पवार यांनी फिरकी घेतली. विरोधकांची बटन दाबू नका, आम्ही घसा कोरडा करे पर्यंत भाषण करतोय, पुन्हा म्हणायचंय ईव्हीएम मध्येच घोटाळा आहे पण तुझ्या बोटातच घोटाळा आहे त्याच काय अस अजित पवार म्हणाले. त्यांच्या या बोलण्यावर सभेतील उपस्थित नागरिकांना हसू आवरले नाही.

अजित पावरम्हणले, सत्ताधारी हे सभेच्या अगोदरच त्या त्या आंदोलकांना ते पोलीस ठाण्यात नेवून बसवतात. यावर बसलेल्या एका नागरिकाने हि हिट्लरशाही आहे असं म्हटले, यावर अजित पवार म्हणाले...हुकूमशाही आहे हिटलरशाही आहे. तेच चाललं आहे, खाली बसलेल्या आणखी एकाने हि तानाशाही आहे असं म्हटलं. यावर पुन्हा अजित पवार म्हणाले, काय म्हणायचं ते म्हणा फक्त त्यांचं बटन दाबू नका म्हणजे झालं. नाही तर आम्ही घसे कोरडे करतोय आणि पुन्हा म्हणायचं ईव्हीएम मशीनमध्येच घोटाळा आहे. अरे पण तुझ्या बोटातच घोटाळा आहे त्याच काय तुझं बोट तिकडं जातंय अस अजित पवार म्हणाले.

भाजपा पक्ष हा केवळ बोलघेवड्यासारखा बोलत असतो. पाच वर्षांपूर्वी अच्छे दिन चे स्वप्न दाखवली. प्रत्येक्षात मात्र स्वप्न साकार झाली नाहीत अस पवार म्हणाले. पुढे अजित पवार म्हणाले की, भाजपाच्या २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पुरावे दिले होते. तरी हि अनेकांना त्यांनी क्लीनचिट दिली. एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, दिलीप कांबळे, प्रकाश मेहता यांना तिकीट का नाकारले हे नागरिकांना कळू द्या. तुमचा कारभार एवढा चांगला होता तर यांना का तिकीट नाही दिल? असा सवाल ही त्यांनी सत्ताधारी भाजपाला केला. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.