पुणे - कोरोनाच्या परिस्थतीचा फायदा घेत केंद्र सरकारचा खासगीकरणाचा कार्यक्रम जनतेच्या गळी उतरवण्याचा डाव साधत आहे. या काळात कोणी विरोध करणार नाही, हे पाहून खासगीकरण करण्याचा प्रकार खेदजनक आहे. कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी पुणे येथे खासगीकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
एकीकडे आज कोरोनामुळे भयावह आणि भीषण परिस्थितीमध्ये लोक जगता आहेत. अर्थव्यवस्थेसमोर जे भीषण संकट उभे राहिले आहे, त्याला या खासगीकरणामुळे काय उत्तर सापडणार हे अनुत्तरित आहे. त्यामुळे याप्रकारची उपाययोजना ही देशाची फसवणूक आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. संरक्षण क्षेत्र, अंतराळ क्षेत्र तसेच इतर सरकारी क्षेत्रात खासगीकरणाबाबत अर्थमंत्री यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अभ्यंकर बोलत होते.