पुणे - राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या मुख्यालयासमोर राज्यातील कृषी पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी दुपारी हे मुंडन आंदोलन केले. विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.
पुण्यातील कृषी पदव्युत्तर पदवीला व्यवसायिक दर्जा घोषित करावा, कृषी पदव्युत्तर पदवीच्या बंद झालेल्या सर्व शिष्यवृत्ती पूर्वलक्षी प्रभावाने पूर्ववत चालू कराव्यात, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता चालू करावा, अशा या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. तसेच या मागण्यांबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी लेखी आश्वासन द्यावे, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत तीव्र आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.