पुणे - पाटस-दौंड राज्यमार्गावर गॅस वाहतूक करणारा ट्रक पाटसकडून दौंडकडे जात असताना बेटवाडी जवळ पाटा तुटल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. या ट्रकमध्ये गॅस भरलेले सिलेंडर होते. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताला आळा बसवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी
सध्या पाटस-दौंड राज्यमार्गाचे अष्टविनायक माध्यमातून रस्ता दुरुस्तीचे काम चालू आहे. मात्र, हे काम करताना संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना पुलावर संरक्षक कठडे लावले नाही. माहिती फलक व सांकेतिक चिन्ह असलेले फलकही लावण्यात आलेले नाहीत. परिणामी, रात्रीच्या वेळी वाहन चालकांना वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज येत नाही. यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. अपघाताला आळा बसवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
हेही वाचा - बायडन हे तर पूर्वीचे भिडे - गिरीश बापट