ETV Bharat / state

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; तिघांविरोधत गुन्हा दाखल

author img

By

Published : Jan 13, 2022, 5:25 PM IST

इंदापूर तालुक्यातील बोरी येथील अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (दि. १२) सायंकाळी ५ च्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी भवानीनगर पोलिस चौकीमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

बारामती (पुणे) - इंदापूर तालुक्यातील बोरी येथील अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (दि. १२) सायंकाळी ५ च्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी भवानीनगर पोलिस चौकीमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

minor girl committed suicide bori
मुलीचे पत्र

हेही वाचा - Pune Murder : लोणीकंद परिसरात बापलेकाचा खून; पोलीस आरोपींच्या शोधात

शाळेत जात असताना गावातील तीन टवाळखोर मुलांनी या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची माहिती समोर आली. मुलांच्या छेडछाडीला कंटाळून तिने बुधवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मुलीने, मला माहित आहे माझे चुकते, पण आई - वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून आत्महत्या करत असून गावातल्या 'आब्या' मुळे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.

minor girl committed suicide bori
आरोपींची नावे

या प्रकरणी तिच्या वडिलांनी भवानीनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी नववीत शिक्षक होती. या प्रकरणी गणेश संतोष कुचेकर, यश अरूण गरगडे व एक अल्पवयीन मुलगा या तिघांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार नितीन लकडे करत आहेत.

हेही वाचा - Banana Seller Pune : डान्स करुन केळी घेण्याचं आवाहन; पाहा, पुण्यातील केळीवाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.