ETV Bharat / state

पिंपरीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कुटुंबाला 60 लाखांची मदत

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस कर्मचाऱ्यांनी आपलं चोख कर्तव्य बजावत प्राणांचे बलिदान दिले. तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

Pimpri-Chinchwad Police Commissionerate
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय
author img

By

Published : Nov 13, 2020, 2:44 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या महामारीत कर्तव्यावर असताना कोरोनाची बाधा होऊन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 50 लाख आणि पोलीस कल्याण निधीतून 10 लाख असे एकूण 60 लाख रुपये देण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कोरोनामुळे मृत्यू झालेले पोलीस कर्मचारी संतोष प्रताप झेंडे, पोलीस कर्मचारी अंबरनाथ रामचंद्र कोकणे, रमेश वामण लोहकरे, यांच्या कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण-

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना महामारीची एकूण संख्या 90 हजारांचा उंबरठ्यावर आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर करोना महामारीने पायमुळं पसरवली आहेत. सध्या मात्र त्यावर काही प्रमाणात नियंत्रण आल्याचे दिसत आहे.

चोख कर्तव्य बजावत प्राणांचे दिले बलिदान-

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस कर्मचाऱ्यांनी आपलं चोख कर्तव्य बजावत प्राणांचे बलिदान दिले. तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर शेकडो पोलीस कर्मचारी कोरोनावर मात करून कर्तव्यावर रुजू झाले आहेत.

प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे 50 लाख आणि पोलीस कल्याण निधीमधून 10 रुपयांचा धनादेश देण्यात आले आहेत. यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील, अनिल लोहार आदी उपस्थित होते.

हेही वाचा- भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.