पुणे - पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे अप्पाचा ढाबासमोर २ कारचा अपघात झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारमधील ६ मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
नाणेघाटातील निसर्गाचा नजारा पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे विकेंडचा आनंद घेण्यासाठी कळंब येथे राहाणाऱ्या ६ मुली नाणेघाटात कारमधून जात होते. त्याचवेळी पुणे-नाशिक महामार्गावर त्यांच्या कारला अपघात झाली. या अपघातात या ६ मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. तर जखमी मुलींवर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सध्या जुन्नर खेड तालुक्याचा पश्चिम भाग निसर्गाने फुलला असल्याने पुणे, मुंबई येथुन अनेक पर्यटक नाणेघाट, भिमाशंकर परिसरात जात आहेत. पर्यटनाचा आनंद घेत असताना प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत अपघातांच्या ठिकाणी आपली वाहने सावकाश चालवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.