ETV Bharat / state

कोरोना : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात निरीक्षकासह चौघे पॉझिटिव्ह - पिंपरी-चिंचवडमध्ये 4 पोलीस कोरोनाबाधित

दरम्यान, आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आणखी कोणी आले आहे का, याचा शोध घ्यावा लागणार आहे. अन्यथा त्या व्यक्तींकडून इतरांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस आयुक्तालयात अनेक बैठका घेण्यात येतात. या वेळी हजर असलेल्यांनाही संसर्ग होऊ शकतो.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात निरीक्षकासह चौघे पॉजिटिव्ह

author img

By

Published : May 20, 2020, 3:52 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आज चार जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यात एका पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. यामुळे आयुक्तालयातील कोरोना बाधित अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या ६ वर पोहोचली आहे. दोन दिवसांपूर्वी आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची कोविडची टेस्ट घेण्यात आली होती.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दोन दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षकास कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर संपूर्ण आयुक्तालयाचे सॅनिटायझेशन करून घेण्यात आले. तर, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कोविडची टेस्ट करण्यात आली होती. यात आज चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात एका पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे.

दरम्यान, आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आणखी कोणी आले आहे का, याचा शोध घ्यावा लागणार आहे. अन्यथा त्या व्यक्तींकडून इतरांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस आयुक्तालयात अनेक बैठका घेण्यात येतात. तर अनेक नागरिक कामानिमित्त येऊन-जाऊन करतात. त्यामुळे तिथे काही बंधन आणण्याची गरज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.