पुणे 19 Bangladesh People Arrested : पुण्यात अवैध पद्धतीनं वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर ( Illegal Bangladesh National ) पोलिसांनी मोठी कारवाई केली. गुरुवारी रात्री ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या कारवाईत १९ बांगलादेशी नागरिकांना अटक ( 19 Bangladesh People Arrested ) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बुधवार पेठ परिसरातून पोलिसांनी (Illegal bangladeshi migrants in pune) बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
बुधवार पेठ परिसरातून १९ बांगलादेशींना अटक : पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून १९ बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे. हे सर्वजण अवैध पद्धतीनं पुण्यात वास्तव्य करताना आढळून आले आहेत. यात १० बांगलादेशी महिलांसह ९ पुरुषांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकानं बुधवारपेठ परिसरात शोध मोहीम हाती घेत या महिला आणि पुरुषांना अटक केली आहे. हे बांगलादेशी नागरिक बुधवार पेठेत मागील अनेक दिवसांपासून बस्तान बांधून राहिले आहेत. त्यामुळे या बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांनी (Illegal Bangladeshi migrants in India) ही कारवाई केल्याची माहिती पुणे पोलीस दलातील सामाजिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बुधवार पेठेत बांगलादेशातील नागरिक : पुण्यातील बुधवार पेठेत मोठ्या प्रमाणावर देहविक्रय सुरू असतो. बुधवार पेठेत देशविदेशातील वारांगणा देहविक्रय करतात. बांगलादेशातील महिला बुधवार पेठेत मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात धडक कारवाई केली. हे बांगलादेशी नागरिक गेल्या 3 महिन्यांपासून अवैध पद्धतीनं बुधवार पेठेत वास्तव्य करत होते. गुरुवारी रात्री कारवाई करत पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं या सर्वांना ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा :