ETV Bharat / state

Experiment Of Rohan Bhansali: पुण्याच्या 11 वर्षीय रोहनच्या प्रकल्पाची नासाच्या 'क्यूब इन स्पेस प्रोग्राम'मध्ये निवड

सध्याच्या ग्लोबल आणि धावपळीच्या जगात आपल्याला लहान मुले ही मोठ्या प्रमाणावर मोबाईल, गेम्स आणि विविध गोष्टीत व्यग्र असलेले पाहायला मिळतात. पण अश्यातच पुण्याच्या 11 वर्षीय रोहन भंसाळीच्या प्रकल्पाची नासाच्या 'क्यूब इन स्पेस प्रोग्राम'मध्ये निवड झाली आहे. ही खूप अभिमानाची बाब असल्याचे सांगितले जात आहे.

Experiment Of Rohan Bhansali
'क्यूब इन स्पेस प्रोग्राम'मध्ये निवड
author img

By

Published : Jul 14, 2023, 9:31 PM IST

नासाकरिता बनविलेल्या प्रयोगाविषयी रोहन भंसाळीची प्रतिक्रिया

पुणे : नासाच्या अंतराळ मोहिमांची रचना, निर्मिती करून त्यात प्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना देणारा 'क्यूब इन स्पेस प्रोग्राम' ही योजना आहे. यात वास्तविक जगातील किंवा पृथ्वीशी संबंधित समस्यांबाबत छोट्या पातळीवरील प्रयोग केले जातात. यातच १९ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना तळहातावर मावेल एवढा उपग्रह तयार करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.

विविध पातळ्यांवर काटेकोरपणे चाचण्या : अंतराळात जाणारे मनुष्य, सामान आणि यान यांचे अति तीव्र अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्गापासून (यूव्ही, सी, बी, ए) अधिक चांगले रक्षण व्हावे, यासाठी विविध औद्योगिक साहित्याचा यात अभ्यास करण्यात येणार आहे; पण असे असले तरी यामध्ये पुण्यातील 11 वर्षीय रोहन भंसाळी याच्या प्रयोगाचीही निवड झाली आहे. यासाठी नासाच्या चमूने विविध पातळ्यांवर अत्यंत काटेकोरपणे चाचण्या घेतल्या आहेत.

काय म्हणाला रोहन - विद्या व्हॅली स्कूलमध्ये सहावीत शिकणाऱ्या रोहनने आत्मविश्वास आणि उत्साहाने सांगितल की, शाळेतील माझ्या शिक्षिका जया मॅडम यांच्याकडून मला या प्रकल्पाची माहिती मिळाली. मला विज्ञानाची आवड असल्यामुळे त्यासाठी अर्ज करण्यासाठी माझी निवड करण्यात आली. शाळेचा पाठिंबा आणि प्रोत्साहन माझ्यासाठी खरोखरच खूप महत्त्वाचे ठरले. यात माझे मामा आणि माझ्या आईने खूप मोलाचे योगदान दिले आहे.

रोहनच्या प्रयोगाचे वैशिष्ट्य : रोहनने तयार केलेल्या क्यूबमध्ये ४ यूव्ही सेन्सॉर्स, ३ निवडक पदार्थ (रेशीम, ॲल्युमिनियम आणि प्लॅस्टिक) आणि मायक्रोप्रोसेसर यांचा समावेश आहे. या क्यूबने स्ट्रॅटोस्फिअरमध्ये केलेल्या १२ तासांच्या प्रवासात प्रत्येक ५ मिनिटांनी यात माहिती गोळा करण्यात येणार आहे. स्ट्रॅटोस्फिअर हा वातावरणातील १,६४,०४१ फूट उंचीवरील भाग असतो. त्या तुलनेत विमाने ही समुद्रसपाटीपासून ३० हजार फुटांवरून उडतात. असे एकूण रोहनच्या या प्रयोगाचे वैशिष्ठ्य आहे.

रोहनने मांडले प्रयोगातील अनुभव : रोहन म्हणाला की, अंतराळ हे खूप रोमांचक आहे आणि अजूनही खूप अज्ञात आहे. आपल्या सूर्यमालेची त्रिज्या जवळपास ९ अब्ज किमी एवढी आहे आणि एका सूर्यामध्ये १३ लाख पृथ्वी बसू शकतात. संशोधन करताना या अचंबित करणाऱ्या गोष्टी मला कळाल्या. म्हणून, सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या पदार्थावर उदा. कपड्यांसाठी रेशीम किंवा अन्न आणि औषधांच्या पॅकेजिंगवर होणारा परिणाम याचा अभ्यास मला करायचा होता. मी सेन्सॉर्स, एक छोटा संगणक आणि कोडेड प्रोग्राम असलेला 4 बाय 4 से.मी.चा प्रयोग तयार केला. तो आपोआप चालेल. अंतराळ मोहिमेदरम्यान मानवी शरीरावर किरणोत्सर्गासारख्या प्रतिकूल परिणाम करणाऱ्या धोक्यावर नासा संशोधन करत आहे. अगदी बचावात्मक कवच असतानाही अंतराळवीरांना दररोज छातीच्या एक्स-रेच्या तुलनेत ८ पट किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागते. त्यामुळे, अतिनील किरणांपासून कोणता पदार्थ जास्त संरक्षण देईल आणि अंतराळवीरांचा बचाव करेल, यावर त्याने लक्ष केंद्रित केले. यासाठी दैनंदिन वापरात वापरले जाणारे रेशीम, ॲल्युमिनियम व प्लॅस्टिक अशा साहित्यांची निवड करण्यात आली. मोठं होऊन चंद्रयान 4 लाँच करायचं आहे, असे देखील रोहन म्हणाला.

काय म्हणाली रोहनची आई? याबाबत रोहनची आई म्हणाली की, रोहनने या प्रोजेक्ट बाबत खूप मेहनत घेतली आहे. शाळेसह तो यासाठी खूप शोध करत होता आणि त्याच्या या निवडीमुळे आम्हाला खूपच आनंद झाला आहे. असे यावेळी रोहनची आई कविता भंसाळ यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.