परभणी - मानवत येथील प्रभारी तालुका समादेशकाला एका होमगार्डकडून पुनर्मूल्यांकनासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी परभणी शहरात करण्यात आली. आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शेख नजीर शेख नूर (वय 51, रा. सरफराज नगर परभणी) असे लाच स्वीकारणाऱयाचे नाव आहे. त्याच्याकडे मानवत तालुका होमगार्ड कार्यालयाच्या समादेशकाचा प्रभारी कार्यभार असून तो अंशकालीन लिपिक म्हणूनदेखील काम करतो. त्याच्याकडे गेलेल्या एका होमगार्डला तीन वर्षे केलेल्या कामगीरीचे पुर्नमुल्यांकन करून पुन:नियुक्ती करून देण्यासाठी 3 हजाराची मागणी केली होती. परंतु लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्या होमगार्डने परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी 4 जून रोजी मानवत येथे भेट देवून पडताळणी केली असता, शेख नजीर शेख नुर याने तक्रारदारास लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मंगळवारी परभणी बस स्टॅन्डसमोरील एका हॉटेलमध्ये सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचेची रक्कम त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक एन.जे. शेख, पोलीस उपअधीक्षक जी.आर. विखे, पोलीस निरीक्षक गव्हाणकर, विवेकानंद भारती, हनुमंते, जहागरीदार, अनिल कटारे, अविनाश पवार, शेख मुखीद, कुलकर्णी, धबडगे, माणिक चट्टे, सारिका टेहरे, दंडवते, भालचंद्र बोके, रमेश चौधरी यांनी पार पाडली.
परभणीत 3 हजारांची लाच घेताना 'होमगार्ड'चा तालुका समादेशक अटकेत
प्रभारी तालुका समादेशकाला एका होमगार्डकडून पुनर्मूल्यांकनासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
परभणी - मानवत येथील प्रभारी तालुका समादेशकाला एका होमगार्डकडून पुनर्मूल्यांकनासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी परभणी शहरात करण्यात आली. आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शेख नजीर शेख नूर (वय 51, रा. सरफराज नगर परभणी) असे लाच स्वीकारणाऱयाचे नाव आहे. त्याच्याकडे मानवत तालुका होमगार्ड कार्यालयाच्या समादेशकाचा प्रभारी कार्यभार असून तो अंशकालीन लिपिक म्हणूनदेखील काम करतो. त्याच्याकडे गेलेल्या एका होमगार्डला तीन वर्षे केलेल्या कामगीरीचे पुर्नमुल्यांकन करून पुन:नियुक्ती करून देण्यासाठी 3 हजाराची मागणी केली होती. परंतु लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्या होमगार्डने परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी 4 जून रोजी मानवत येथे भेट देवून पडताळणी केली असता, शेख नजीर शेख नुर याने तक्रारदारास लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मंगळवारी परभणी बस स्टॅन्डसमोरील एका हॉटेलमध्ये सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचेची रक्कम त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक एन.जे. शेख, पोलीस उपअधीक्षक जी.आर. विखे, पोलीस निरीक्षक गव्हाणकर, विवेकानंद भारती, हनुमंते, जहागरीदार, अनिल कटारे, अविनाश पवार, शेख मुखीद, कुलकर्णी, धबडगे, माणिक चट्टे, सारिका टेहरे, दंडवते, भालचंद्र बोके, रमेश चौधरी यांनी पार पाडली.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत:- acb office vis.
Conclusion: