ETV Bharat / state

परभणीत मौसमातील उच्चांकी तापमानाची नोंद; पारा 46 अंशावर - उष्णता

गेल्या चार दिवसांपासून परभणीत उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.

परभणीत मौसमातील उच्चांकी तापमानाची नोंद; पारा 46 अंशावर
author img

By

Published : Apr 27, 2019, 5:53 PM IST

परभणी - गेल्या चार दिवसांपासून परभणीत उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. आज शनिवारी परभणीत तब्बल 46 अंश डिग्री सेल्सिअस एवढे तापमान नोंदविण्यात आले आहे. या मौसमातील हे उच्चांकी तापमान असून त्यामुळे परभणीकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

परभणीत मौसमातील उच्चांकी तापमानाची नोंद

यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच परभणीच्या तापमानात काहीशी वाढ झाली होती. मात्र, मार्च महिन्यात तुरळक प्रमाणात झालेला अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. गेल्या 8 दिवसात तापमानात वाढ होऊन हे तापमान 45.7 अंशावर पोहोचले. तर आजचे तापमान 46 अंशावर पोहोचले आहे. या वाढलेल्या तापमानामुळे नागरिक सकाळी ११ नंतर घराबाहेर पडताना दिसत नाहीत.

तापमानामुळे शहरात बाजारपेठा ओस पडल्या आहेत. तसेच दुसरीकडे ताप, खोकला यासारख्या साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: लहान मुलांना वाढत्या तापमानाचा सामना करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

डॉक्टरांचा सल्ला -
लहान मुलांना रूमाल बांधल्याशिवाय बाहेर पाठवू नये, अंगावर सैल आणि कॉटनचे कपडे घालावेत, तीव्र किरणांपासून बचाव करण्यासाठी गॉगल्स वापरावेत. तसेच पाणीदार फळे टरबुज, अंगुर, खरबुज, काकडी शिवाय फळांचे ज्युस, सरबत आणि उसाचा रस नियमित सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर्स देत आहेत.

'या' ठिकाणी 1 अंश तापमान कमी -
परभणी शहरामधील तापमान 46 अंश नोंदवले गेले असले तरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात आज शनिवारचे कमाल तापमान 45 अंश एवढे नोंद झाले आहे. कारण कृषी विद्यापीठाच्या परिसरात सर्वत्र हिरवळ असून त्या हिरवळीचा परिणाम या ठिकाणच्या तापमानावर जाणवतो.

Intro:परभणी - गेल्या चार दिवसांपासून परभणीत उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. आज शनिवारी तर कहर झाला असून परभणीत तब्बल 46 अंश डिग्री सेल्सिअस एवढे तापमान नोंदविण्यात आले आहे. या मौसमातील हे उच्चांकी तापमान असून त्यामुळे परभणीकरांच्या जीवाची काहिली होत आहे.Body: दरम्यान, यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच परभणीच्या तापमानात काहीशी वाढ झाली होती. मात्र मार्च महिन्यात तुरळक प्रमाणात झालेला अवकाळी पाऊसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. मात्र गेल्या आठ दिवसात वाढ होत जाऊन हे तापमान काल शुक्रवारी 45.7 अंशावर पोहचले होते. तर आज रेकॉर्ड ब्रेक होऊन तापमान 46 अंशावर पोहचले आहे. या प्रचंड तापमानामुळे नागरिक सकाळी ११ नंतर घराबाहेर पडताना दिसत नाहीत तर दिवसभराच्या उष्णतेमुळे संध्याकाळनंतर बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. शहरात बाजारहटासाठी येणारी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. तसेच दुसरीकडे प्रचंड तापमानामुळे ताप, खोकल्या सारखे साथीचे आजार बळावले आहेत. विशेषत: लहान मुलांना वाढत्या तापमानाचा सामना करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लहान मुलांना रूमाल बांधल्याशिवाय बाहेर पाठवू नये, अंगावर सैल आणि कॉटनचे कपडे घालावेत, तीव्र किरणांपासून बचाव करण्यासाठी गॉगल्स वापरावेत. तसेच पाणीदार फळे टरबुज, अंगुर, खरबुज, काकडी शिवाय फळांचे ज्युस, सरबत आणि उसाचा रस नियमित सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर्स देत आहेत.

" 'या' ठिकाणी 1 अंश तापमान कमी "

दरम्यान, परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात आज शनिवारचे कमाल तापमान 45 अंश एवढे नोंद झाले आहे. कारण कृषी विद्यापीठाच्या परिसरात सर्वत्र हिरवळ असून त्या हिरवळीचा परिणाम या ठिकाणच्या तापमान मोजणी यंत्रावर जाणवतो. तर परभणी शहरातील बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात शासनाचे तापमान मोजणी यंत्र आहे. या परिसरात सर्वत्र घरे, कार्यालयांचे बांधकाम असून सिमेंटचे जंगल पसरले आहे. याचा परिणाम तापमान मोजणी यंत्रावर होतो. त्यामुळे दरवेळी कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागापेक्षा या ठिकाणचे तापमान एक ते दीड अंश सेल्सिअसने अधिक दर्शवले जाते. याउलट हिवाळ्यात कृषी विद्यापीठात निच्चांकी तापमान कमी दाखवण्यात येते तर शासनाच्या यंत्रावर ते अधिक असते.
- गिरीराज भगत, परभणी
- सोबत :- photo, visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.