ETV Bharat / state

'माझा गाव सुंदर गाव': औरंगाबाद विभागात झरी ग्रामपंचायतीपासून योजनेला सुरुवात

author img

By

Published : Jan 22, 2021, 5:44 PM IST

Updated : Jan 22, 2021, 6:03 PM IST

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेमधून 22 जानेवारी ते 20 मार्च या कालावधीमध्ये विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये 'माझा गाव सुंदर गाव' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार या उपक्रमाची सुरुवात विभागीय आयुक्त केंद्रेकर यांचे मूळ गाव झरी येथून करण्यात आली.

माझा गाव सुंदर गाव योजनेची सुरुवात
माझा गाव सुंदर गाव योजनेची सुरुवात

परभणी - ग्रामीण भाग स्वच्छतेने स्वयंपूर्ण व्हावा, म्हणून औरंगाबाद विभागात सुरू झालेल्या 'माझा गाव, सुंदर गाव' या उपक्रमाची विभागस्तरीय सुरुवात आज (शुक्रवारी) परभणी तालुक्यातील झरी या ग्रामपंचायतीमधून करण्यात आली. झरी हे गाव विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे मूळ गाव आहे. या उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेमधून 22 जानेवारी ते 20 मार्च या कालावधीमध्ये विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये 'माझा गाव सुंदर गाव' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार या उपक्रमाची सुरुवात विभागीय आयुक्त केंद्रेकर यांचे मूळ गाव झरी येथून करण्यात आली.

'माझा गाव, सुंदर गाव' या उपक्रमाची विभागस्तरीय सुरुवात
'पारितोषिके देऊन गावांचा होणार गौरव -या उपक्रमामध्ये जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींचा गौरवदेखील करण्यात येणार आहे. गाव स्वच्छता, उकिरडे गावा बाहेर काढणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंड्या ठेवणे, सांडपाणी व घनकचरा चे नियोजन करणे, प्लास्टिक बंदी, वृक्ष लागवड असे विविध उपक्रम या माध्यमातून गावात राबविले जाणार आहेत.'यांच्या उपस्थितीत झाली सुरुवात -आज (22 जानेवारी) या अभियानाची विभागस्तरीय सुरुवात परभणी तालुक्यातील झरी या ग्रामपंचायतीमधून करण्यात आला. यावेळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेदमुथा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बागले, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके, जिल्हा कृषी अधिकारी हनुमंत ममदे, उपअभियंता गंगाधर यंबडवार, गट विकास अधिकारी अनुप पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्चना देशमुख, गजानन देशमुख, ग्रा.पं.सदस्य दिलीप देशमुख, ग्रामविकास अधिकारी आनंद खरात आदींची उपस्थिती होती.'स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड - याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी गावातील नागरिकांशी निराधार पगार, रेशन व घरकुल यादी विषयावर संवाद साधत मंदिर परिसरात स्वच्छता केली. तसेच धनगर समाज स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.'स्वच्छतेसाठी त्रिसूत्रीचा समन्वय साधणे खूप महत्त्वाचे - जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, गाव विकासामध्ये नागरिकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. त्याशिवाय गावे स्वच्छ होणार नाहीत. तसेच गावे जर स्वच्छ व संपन्न बनवायचे असतील, तर गावात शौचालय, मुबलक पाणी पुरवठा आणि घरांची उभारणी, या त्रिसूत्रीचा समन्वय साधणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच लोकांनी प्लास्टिक मुक्तीवर भर द्यावा आणि ज्या व्यक्तींकडे जागा उपलब्ध आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला एमआरजीएस मधून शौचालय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच त्यांनी पुढाकार घेतला तर गावांमध्ये 50 हजार वृक्ष उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.'सर्वांगीण विकासासाठी श्रमदान करण्याचे आवाहन'स्वतःच्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जाणीवपूर्वकने श्रमदान करण्याचे आवाहन औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी केले. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी गावातील महिलांच्या व गावाच्या सन्मानासाठी सगळ्यांनी शौचालयाचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वच्छ भारत मिशन कक्षातील संवाद ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले, तर आभार महेश मठपती यांनी मानले.

Last Updated : Jan 22, 2021, 6:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.