ETV Bharat / state

परभणीत 24 जण कोरोनामुक्त झाल्यानंतर काही तासातच पुन्हा आढळले 4 नवे रुग्ण - parbhani corona cases

परभणी जिल्ह्यात 4 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या वाढीव आकडेवारीसह परभणीतील रुग्ण संख्या आता 86 वर पोहोचली आहे.

24 COVID-19 patients recovered in parbhani
जिल्हा रुग्णालय, परभणीत 24 जणांना डिस्चार्ज दिल्यानंतर काही तासातच पुन्हा आढळले
author img

By

Published : Jun 2, 2020, 8:52 AM IST

परभणी - जिल्ह्यात सोमवारी (दि. 1 जून) 24 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यानंतर काही तासांतच आणखी चार कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. सोमवारी आलेल्या 102 अहवालांमध्ये 4 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या वाढीव आकडेवारीसह परभणीतील रुग्ण संख्या आता 86 वर पोहोचली आहे. त्यापैकी 25 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाला सोमवारी (दि. 1 जून) सायंकाळपर्यंत एकही अहवाल प्राप्त झाला नव्हता. त्यातच 24 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयांतून सुट्टी देण्यात आली. यामुळे परभणीकरांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु त्यांचे हे समाधान क्षणिक ठरले. रात्री दहाच्या सुमारास नांदेड येथील लॅबमधून आलेल्या 102 जणांच्या अहवालात 4 नवीन रुग्ण आढळून आले. ज्यामध्ये मानवत शहरातील 3 तर जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा येथील एका जण कोरोना पॉझिटिव्ह आहे.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयात 13 संशयीत दाखल आहेत. यासह परभणी जिल्ह्यातील एकूण संशयितांची संख्या आता 2 हजार 344 वर पोहोचली आहे. यातील 136 संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत.

आतापर्यंत 2 हजार 80 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकूण 86 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. दुसरीकडे जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या विलगिकरण कक्षात 545 तर रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 288 जणांना ठेवण्यात आले आहे. यापूर्वी विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करून घरी परतणाऱ्यांची संख्या 1 हजार 511 इतकी आहे.

हेही वाचा - परभणीत मान्सूनपूर्व पाऊस... नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

हेही वाचा - परभणीच्या जिंतूर तालुक्यात धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.