पालघर - वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने थैमान घातले आहे. या ठिकाणी दिवसाला सरासरी १५० ते २०० नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. रविवारी वसई-विरारमध्ये एका दिवसात १७४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १७ हजार ९१७ एवढी झाली आहे. रविवारी दिवसभरात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला असून २१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण ३८३ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत १५ हजार ३६४ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या २ हजार १७९ कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.