पालघर - डहाणू तालुक्यातील बहाड नांगरखाडीत ( Nagarkhadi ) समुद्रकिनारी मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची ( Two friends drowned while fishing ) घटना 11 जुलै रोजी बहाड येथे घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पालघर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे नदी, नाले ओसांडून वाहत आहेत. यामुळे बहाड परिसरातील समुद्राची पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली आहे. असे असतानाही दोन मित्र मासे पकडण्यासाठी गेले असता समुद्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे गोपाळ नारायण मडवे, वय ४४, रा..बहाड, वसंत हरी राऊत, वय ४३ वर्ष,रा.बहाड. या दोघां सख्या मित्रांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
गावकऱ्यात हळहळ व्यक्त - दोघे नांगरखाडीत ( Nagarkhadi ) समुद्रकिनारी मासे पकडण्यासाठी गेले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी समुद्रकिनारी त्यांचा शोध घेतला. परंतू, सोमवारी रात्रीपर्यंत त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाहीं. पुन्हा मंगळवारी सकाळी गावातील नागरिकांनी त्यांचा समुद्रकिनारी शोध घेतला असता, त्या दोघांचेही मृतदेह नांगरखाडी समुद्रकिनारी सापडला. नांगरखाडीत सध्या समुद्राच्या पाण्याला भरती आली आहे. त्यातच गेल्या पाच दिवसांपासून धो धो पाऊस कोसळत आहे. नांगरखाडीला आलेल्या पुराच्या प्रचंड ओढीने खाडीत दलदल निर्माण झाली आहे. दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले आहे. सदरील घटनेचा पोलीस पंचनामा वाणगाव पोलिसांनी करून दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केले. सायंकाळी बहाड येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. वसंत हरी राऊत तसेच गोपाल नारायण बडवे यांच्या निधनामुळे गावकऱ्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - Three Children Drown In Pune : शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन लहान मुलांचा मृत्यू