ETV Bharat / state

कोरोनाचा धसका; तुंगारेश्वर देवस्थान दर्शनासाठी बंद ठेवण्याची विश्वस्तांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - तुंगारेश्वर देवस्थान दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

हिन्दी भाषिक, मारवाडी, गुजराती या नागरिकांचा श्रावण महिना ६ जुलैपासून सुरू होत आहे. तर मराठी भाषिकांचा २१ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. त्या निमित्ताने प्रत्येक रविवारी व सोमवारी श्री तुंगारेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी सुमारे १० ते १५ हजार भाविक येतात. त्यामुळे मंदिराच्या विश्वस्तांनी धसका घेतला आहे.

temple
तुंगारेश्वर देवस्थान
author img

By

Published : Jul 1, 2020, 6:43 PM IST

Updated : Jul 1, 2020, 7:14 PM IST

पालघर - संपूर्ण देशात कोरोनाच्या माहामारीमुळे मंदिरे दर्शनासाठी बंद केली आहेत. परंतु आता जून महिन्यानंतर काही मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याचा शासनाचा विचार आहे. मात्र कोरोना विषाणू संसर्गाचा धसका तुंगारेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतला आहे. तुंगारेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याची मागणी विश्वस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कोरोनाचा धसका; तुंगारेश्वर देवस्थान दर्शनासाठी बंद ठेवण्याची विश्वस्तांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

आगामी ६ जुलैपासून हिन्दी भाषिक, मारवाडी, गुजराती या नागरिकांचा श्रावण महिना सुरु होत आहे. तर मराठी भाषिकांचा २१ जुलैपासून श्रावण सुरु होत आहे. त्या निमित्ताने प्रत्येक रविवारी व सोमवारी श्री तुंगारेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी सुमारे १० ते १५ हजार भाविक येतात तसेच पर्यटक सुद्धा या परिसरात मोठ्या प्रमाणात येतात.

महामारीची साथ चालू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येत असल्याने महामारीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुंगारेश्वर मंदिर बंद ठेवून अभयारण्यात पर्यटनास परवानगी देऊ नये, अशी मागणी श्री तुंगारेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी केली आहे.

Last Updated : Jul 1, 2020, 7:14 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.