ETV Bharat / state

महानगरपालिकेच्या बेवारस बसमुळे वाहतूक कोंडी; नालासोपाऱ्यात बेवारस बस

author img

By

Published : Feb 13, 2021, 6:36 PM IST

नालासोपारा पूर्वेला उड्डाणपुलाखाली अनेक फेरीवाले उभे असतात. त्यातच रस्त्यालगत असणार्‍या रिक्षा स्टँडमुळे आणि एका बाजूला असणाऱ्या फेरीवाल्यांमुळे हा रस्ता अरुंद बनला आहे. शासनाने बनवलेल्या रस्त्यांपैकी अर्धा रस्ता वाहतुकीला उपयोगात पडत असतो तर अर्धा रस्ता फेरीवाले आणि रिक्षावाले यांच्यामुळे व्यापला गेला आहे. त्यातच पालिकेची ही बेवारस पडलेली बस वाहतुकीला मोठी कोंडी निर्माण करत आहे.

traffic jams due to unattended municipal buses in nalasopara
महानगरपालिकेच्या बेवारस बसमुळे वाहतूक कोंडी

नालासोपारा (पालघर) - वसई-विरार महानगर पालिकेच्या परिवहन सेवेच्या बेवारस बसमुळे नालासोपारा पूर्व भागात सकाळ आणि संध्याकाळ मोठी वाहतूक कोंडी वाढते आहे. रस्त्यालगत उभ्या असलेल्या बेवारस बसमुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते आहे.रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या अनाधिकृत फेरीवाल्यांमुळे आणि कुठेही उभ्या असणाऱ्या रिक्षामुळे वाहनचालकांचा जीव मेटाकुटीला आलेला असतो. त्यातच कित्येक दिवसापासून बेवारसपणे उभी असलेली ही बस वाहतुकीला मोठी कोंडी निर्माण करत असल्याचे मत वाहन चालक व्यक्त करत आहेत.

नालासोपारा पूर्व भागात पालिकेच्या परिवहन सेवेच्या बेवारस बसमुळे मोठी वाहतूक कोंडी

नालासोपारा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. नालासोपारा पूर्वेला उड्डाणपुलाखाली अनेक फेरीवाले उभे असतात. त्यातच रस्त्यालगत असणार्‍या रिक्षा स्टँडमुळे आणि एका बाजूला असणाऱ्या फेरीवाल्यांमुळे हा रस्ता अरुंद बनला आहे. शासनाने बनवलेल्या रस्त्यांपैकी अर्धा रस्ता वाहतुकीला उपयोगात पडत असतो तर अर्धा रस्ता फेरीवाले आणि रिक्षावाले यांच्यामुळे व्यापला गेला आहे. त्यातच पालिकेची ही बेवारस पडलेली बस वाहतुकीला मोठी कोंडी निर्माण करत आहे. पालिकेने लवकर उभी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

महानगरपालिकेचे बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश

काही दिवसापूर्वी वसई-विरार महानगरपालिकेने स्त्यालगत उभ्या असणार्‍या बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. एकीकडे पलिकेनेच बेवारस वाहनांवर कारवाईचे आदेश दिले तर दुसरीकडे खुद्द पालिकेची बसच बेवारस पणे उभी आहे. मग आता या बसवर कारवाई कधी होणार असा प्रश्न या ठिकाणी नागरिक करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.