पालघर - बोईसर परिसरात रात्रीच्या वेळी चोरांचा सुळसुळाट पसरल्याचे समोर आले आहे. विद्यानगर परिसरातील सह्याद्री आणि सिद्धी विनायक सोसायटी परिसरात चोरी करण्याच्या हेतूने 'हाफपँट' घातलेले व चेहरे झाकलेले पाचजण फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
बोईसर परिसरातील काही संशयित व्यक्ती चोरी करण्याच्या हेतूने फिरत असल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमधून समोर आले आहे. बोईसर येथील विद्यानगर परिसरातील चिन्मया हायस्कुलनजीक असलेल्या सह्याद्री आणि सिद्धी विनायक सोसायटीच्या आवारात हे पाचजण चोरी करण्याच्या हेतूने फिरत होते. शनिवारी रात्री १ च्या सुमारास 'हाफपँट' घातलेल्या व चेहरे झाकलेल्या चोरांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत.
हेही वाचा - बदलत्या हवामानामुळे खरीपानंतर रब्बी पिकांच्याही नुकसानीची शेतकऱ्यांना भीती
गेल्या काही दिवसांपासून बोईसर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. रहदारीच्या ठिकाणी चोरट्यांच्या खुलेआम वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरट्यांवर अद्याप कुठलीच कारवाई होत नसल्याचे दिसत चित्र आहे. त्यामुळे चोरांना पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा धाकच राहिला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची 'एकला चलो'ची भूमिका?