ETV Bharat / state

दिवाळीपर्व : पालघरमध्ये आदिवासींच्या आकाश कंदिलांना उत्तम प्रतिसाद

सावरे गावातील कलाशिक्षक विनोद वनगा यांना लहानपणापासूनच हस्तकलेची आवड होती. त्यामुळे शाळेत असताना ते बांबू आणि गवताच्या ताटरापासून विविध वस्तू तयार करून शिक्षक आणि मित्रांना भेट स्वरूपात देत असत. आपल्यातील कलेला वाव मिळावा म्हणून त्यांनी बारावीनंतर वसई विकासिनी संस्थेत कलाशिक्षण घेतले.

Sky lanterns are made from baskets in palghar
टोकरपासून तयार केले जातायेत आकाशकंदिल
author img

By

Published : Nov 13, 2020, 5:27 PM IST

Updated : Nov 13, 2020, 8:19 PM IST

पालघर - आदिवासीबहुल दुर्गम भागातील एका आदिवासी कला शिक्षकाने हस्तकलेतून बांबूचा (टोकर) वापर करून तयार केलेल्या आकाशकंदिलांना अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे. शिक्षकाने तयार केलेल्या 12 प्रकारच्या आकाशकंदिलांना संपूर्ण महाराष्ट्र तसेच परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली आहे. अडीच महिन्यांपूर्वी मोजकेच आकाशकंदिल तयार करून आपल्या ग्रामपंचायत हद्दीत विक्री करण्याचा उद्देश बाळगून विनोद वनगा हे शिक्षक कामाला लागले होते. यानंतर आता त्यांच्या या हस्तकलेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. तसेच सावरे-एम्बुर ग्रामपंचायत हद्दीतील सासे पाड्याचे नाव बांबूच्या आकाशकंदिलांमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि विदेशात पोहोचले आहे.

हस्तकला शिक्षक, आकाशकंदिल बनविणारे कलाकार आणि ग्राहक याबाबत प्रतिक्रिया देताना.

सावरे गावातील कलाशिक्षक विनोद वणगा यांना लहानपणापासूनच हस्तकलेची आवड होती. त्यामुळे शाळेत असताना ते बांबू आणि गवताच्या ताटरापासून विविध वस्तू तयार करून शिक्षक आणि मित्रांना भेट स्वरूपात देत असत. आपल्यातील कलेला वाव मिळावा म्हणून त्यांनी बारावीनंतर वसई विकासिनी संस्थेत कलाशिक्षण घेतले. त्यानंतर दुर्वेसच्या जिल्हा परिषद शाळेत काही वर्षे अंशकालीन कलाशिक्षकपदाची नोकरीही केली. मात्र, त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून घर चालवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी रोजंदारी तसेच तारापूर एमआयडीसीमध्येही काम केले. मात्र, हातातील कला साद देत असल्याने त्यांनी सावरे परिसरातील शाळा सजावट, शाळा रंगवणे, कार्टून काढणे आदी कामे करण्यास सुरुवात केली. त्यातून आपल्या संसाराचा रहाटगाडा हाकत होते. दरम्यानच्या काळात ते बांबूंपासून पेपर वेट, इमारतीची आणि घराची प्रतिकृती अशा भेट देण्यासाठी वापरात येणाऱ्या वस्तू तयार करण्याचे काम करत होते.

हेही वाचा - पालघरमध्ये लोकप्रिय होताहेत चॉकलेट फटाके...

हस्तकलेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मिळतोय स्वयंरोजगार -

गणेशोत्सवानंतर दिवाळी सणानिमित्त बांबूंपासून आकाशकंदिल तयार करून आपल्या गावातच त्यांची विक्री करण्याचा विचार विनोद वनगा यांनी महेंद्र हाडळ आणि बंदु मोहनकर या मित्रांसमोर बोलून दाखवला होता. मित्रांच्या पाठबळावर 1200 रुपयांच्या गुंतवणूकीतून वणगा यांच्या शेतातील घरात काम सुरू करण्यात आले. महिनाभरात दोन कामगारांच्या साहाय्याने 12 प्रकारचे दोनशे आकाशकंदिल तयार झाले. त्यानंतर तयार आकाशकंदिलांच्या विक्रीची समस्या निर्माण झाली. यावर वणगा आणि त्यांच्या मित्रांनी आकाशकंदिलांचे फोटो त्यांच्या किमतीसह सावरे टोकर कला केंद्राच्या नावाने गावातील व्हाट्सअ‌ॅप ग्रुप आणि फेसबुक शेअर केले.

सुरुवातीला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, सावरे टोकर कला केंद्रातील आकाशकंदिलांचे फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर मागणीत वाढ होण्यास सुरुवात झाली. आकाशकंदिलांच्या खरेदीसाठी लोक सावरे गावातील सासे पाड्यातील टोकर कला केंद्राचा शोध घेत येऊ लागले. मागणी वाढल्याने कला केंद्रातील कामगारांची संख्या वाढली. सध्या 20 कामगार आकाशकंदिल तयार करण्याचे काम करीत आहेत.

बांबूपासून तयार करण्यात येतात आकाशकंदिल

बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांचा उत्तम दर्जा, टिकाऊपणा आणि माफक किमतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली आहे. हाताने तयार होत असल्याने दिवसभरात फक्त 15 आकाशकंदील तयार होतात. मागणीपेक्षा कमी आकाशकंदिल तयार होत असल्याने वनगा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपले फोन बंद करण्याची वेळही आली. हस्तकलेला मिळालेल्या प्रतिसादामुळे वणगा यांना मोठा हुरूप आला आहे. दिवाळीनंतर बांबूपासून पेपर वेट, फोटो फ्रेम, वाल सिलिंग, फुलदाणी, क्रिकेटचे चषक आणि शोभिवंत वस्तू तयार करण्याचे काम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वारली पेंटिंग पासून प्रेरणा घेत आदिवासी कला आणि संस्कृती आकाशकंदील आणि इतर वस्तूंमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Last Updated : Nov 13, 2020, 8:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.