ETV Bharat / state

Rain Update : वसई-विरारला मुसळधार पावसाची हजेरी

मुसळधार पावसाने ( Heavy Rain) सलग तिसऱ्या दिवशीही वसई-विरार (Presence of torrential rain) शहराला झोडपून काढले. परिणामी शहरातील अनेक सखल भागांत दरवर्षीप्रमाणे पाणी साचल्याने नागरीकांची तारांबळ उडाली (The cable of citizens flew).

वसई-विरारला
वसई-विरारला
author img

By

Published : Jul 6, 2022, 8:12 PM IST

विरार: मुसळधार पावसाने ( Heavy Rain) सलग तिसऱ्या दिवशीही वसई-विरार (Presence of torrential rain) शहराला झोडपून काढले. परिणामी शहरातील अनेक सखल भागांत दरवर्षीप्रमाणे पाणी साचले. शहरातील काही सोसायटी आणि घरांत पाणी शिरल्याने नागरिकांना मंगळवारची रात्र पाण्यात काढावी लागली.

शहरातील मुख्य रस्तेही पाण्याखाली गेल्याने शहरात सकाळपासून वाहतूक कोंडी झालेली दिसत होती. परिणामी नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना ट्रॅक्टर व त्यावेळी मिळेल त्या वाहनांनी प्रवास करावा लागत होता.विरार पश्चिम येथील विवा कॉलेज, जकात नाका, नालासोपारा पूर्व येथील तुळींज रोड, सेंट्रल पार्क व वसईतील एव्हर शाईन रस्ता तिसऱ्या दिवशीही पाण्याखाली होता. वसईतील सनसिटी-गास रोडची स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. मंगळवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे वसईत काही ठिकाणी मोठमोठ्या वृक्षांची पडझड झालेली पाहायला मिळाली.

वसई-पाचूबंदर येथील एका घरावर लिंबाचे झाडाची फांदी झुकल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेच्या वसई गाव अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी रवाना होत; मशीनने झाड कापून बाजूला केले. अशाच प्रकारची दुसरी पडझडची घटना वसई पश्चिम भुईगाव स्वामी वाडी येथे घडली. वसई पश्चिम भुईगाव स्वामी वाडी येथे रस्त्याजवळील वडाचे झाड मुळातून उन्मळून सतीश दुकाली यांच्या घराच्या समोरील पत्र्याच्या शेड वर पडले. याबाबतची माहिती प्रमोद भोईर यांनी दिल्यानंतर उपस्थानक अग्निशमन केंद्र सनसिटी दिवाणमान यांच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत हे झाड कापून बाजूला केले.

नालासोपारा पश्चिम-वाघोली येथेही चिंचेचा जुना वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने, या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. या घटनेत या मार्गावरुन जाणारी यासीन खान ही महिला जखमी झाली आहे. तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या पतीने दिली आहे. अग्निशमन दलाला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी या परिसरातील वीजपुरवठा खंडित करून; झाड कापून रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, पावसाचा जोर संध्याकाळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय व वसई-विरार महापालिकेने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मागील २४ तासांत वसई-विरार शहर परिसरात २१७ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

हेही वाचा : Heavy Rain : मुंबईत मुसळधार, कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्टसह हाय टाईडचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.