ETV Bharat / state

पालघर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; 57 पैकी 37 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव - पालघर जिल्हा परिषदे निवडणूक 2020

पालघर जिल्हा परिषदेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी बुधवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. परिषदेच्या 57 जागांपैकी 37 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्या आहेत. केवळ एक जागा अनुसूचित जातीसाठी, 15 जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर 2 सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

पालघर जिल्हा परिषद
author img

By

Published : Nov 21, 2019, 4:46 PM IST

पालघर - जिल्हा परिषदेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी बुधवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. परिषदेच्या 57 जागांपैकी 37 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्या आहेत. केवळ एक जागा अनुसूचित जातीसाठी, 15 जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर 2 सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या चक्राकार आरक्षण पद्धतीमुळे 2015 मध्ये निवडून आलेल्या प्रस्थापितांना मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. या आरक्षणामळे प्रस्थापितांना निवडणुक रिंगणातूनच बाहेर फेकले गेल्याने अनेकांचे राजकीय भवितव्य संकटात सापडले आहे.

पालघर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर

हेही वाचा - पालिका रुग्णालयात 'एम्स'च्या धर्तीवर मिळणार स्वस्त औषधे

जिल्हा परिषदेच्या गटांकरिता आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपजिल्हाधिकारी किरण महाजन व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी शाळकरी विद्यार्थिनीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण करण्यात आले असून अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार पास्थळ, बोईसर व एडवण या तीन गटांमध्ये लोकसंख्या उतरत्या अग्रक्रमाने होत्या. गेल्या निवडणुकीमध्ये पास्थळ गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवले असल्याने चक्राकार पद्धतीने आरक्षण पुढे सरकवत दुसऱ्या क्रमांकाच्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्या असलेल्या बोईसर गटासाठी अनुसूचित जाती करता आरक्षण जाहीर करण्यात आले.

जिल्ह्यात एकूण 37 गटांमध्ये अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी आरक्षण असून जिल्ह्यातील सर्व गटांमधील अनुसूचित जमाती लोकसंख्येच्या आधारावर उतरत्या लोकसंख्येच्या क्रमवारीने मांडणी करण्यात आली. 2015 च्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अनुसूचित जमाती राखीव असलेल्या गटांना वगळून त्याव्यतिरिक्त असलेल्या 19 गटांना अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले. आरक्षित जागांची संख्या पूर्ण करण्याकरिता अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेल्या 18 अग्रक्रमाच्या गटांना यावेळी पुन्हा आरक्षित करण्यात आले. अनुसूचित जमातीसाठी 19 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 19 गटामधून नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या 15 जागा आणि त्यातून 8 महिलांकरिता आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच सर्वसाधारण 4 जागांमधून 2 जागांवर सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी, शिरगाव, केळवे, माहीम तारापूर, कळंब, अर्नाळा, दांडी, चिंचणी, धाकटी डहाणू हे किनारपट्टीवरील गट अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवताना अन्य मनोर, सफाळे, खैरवाडी, वंजारवाडा, पास्थळ व सरावली या शहरी भागांमध्ये अनुसूचित जमाती करता राखीव जागा ठेवण्यात आल्याने अनेक इच्छुक नाराज झाल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद आरक्षण 2020 -

  • अनुसूचित जाती (1) : बोईसर
  • महिला सर्वसाधारण (2) : जामशेत, शिगाव-खुंटड
  • सर्वसाधारण (2) : कुर्झे, उटावली
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (8) : बोर्डी, कासा, पोशेरा, गारगाव, मोज, मांडा, सावरे-ऐंबुर
  • नागरीकांचा मागास प्रवर्ग (7) : उधवा, सरावली (डहाणू), वणई, आलोंडे, आसे, आबिटघर
  • अनुसूचित जमाती महिला (19) : सुत्रकार, मोडगाव, गंजाड, तलवाडा, वावर, कासटवाडी, कौलाळे, खोडाळा, दांडी, सरावली(पालघर), खैरापाडा, ब्राह्मणपुर, सातपाटी, माहीम, केळवे, एडवण, सफाळे, अर्नाळा, कळंब
  • अनुसूचित जमाती (18) :उपलाट, डोंगारी, झाई, धामणगाव, सायवन, ओसरविरा, कैनाड, धाकटी डहाणू, चिंचणी, दादडे, न्याहाळे, कुडूस, तारापूर, पास्थळ, वंजारवाडा, मनोर, भाताणे

हेही वाचा -हिंदुत्वाच्या नावावर शिवसेनेकडून फसवणूक; औरंगाबादेतील मतदाराची पोलीस ठाण्यात तक्रार

Intro:जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर;
57 पैकी 37 जागांवर अनुसूचित जमातीसाठी राखीव; प्रस्थापितांना धक्काBody:
   जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर;
57 पैकी 37 जागांवर अनुसूचित जमातीसाठी राखीव; प्रस्थापितांना धक्का

नमित पाटील,
पालघर, दि.21/11/2019

     पालघर जिल्हा परिषदेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी बुधवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली, असून जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी 37 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्या आहेत. केवळ एक जागा अनुसूचित जातीसाठी, 15 जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर 2 सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या चक्राकार आरक्षण पद्धतीमुळे 2015 मध्ये निवडून आलेल्या प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे. या आरक्षणामळे प्रस्थापितांना निवडणुक रिंगणातूनच बाहेर फेकले गेल्याने अनेकांचे राजकीय भवितव्य संकटात सापडले आहे.

     जिल्हा परिषदेच्या गटांकरिता आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी  पार पडली. जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपजिल्हाधिकारी किरण महाजन व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी शाली विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

    पालघर जिल्ह्यात ग्रामीण बभागांतील लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण करण्यात आले असून अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार पास्थळ, बोईसर व एडवण या तीन गटांमध्ये लोकसंख्या उतरत्या अग्रक्रमाने होत्या. गेल्या निवडणुकीमध्ये पास्थळ गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवले असल्याने चक्राकार पद्धतीने आरक्षण पुढे सरकवत दुसऱ्या क्रमांकाच्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्या असलेल्या बोईसर गटासाठी अनुसूचित जाती करता आरक्षण जाहीर करण्यात आले.

     जिल्ह्यात एकूण 37 गटांमध्ये अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी आरक्षण असून जिल्ह्यातील सर्व गटांमधील अनुसूचित जमाती लोकसंख्येच्या आधारावर उतरत्या लोकसंख्येच्या क्रमवारीने मांडणी करण्यात आली. 2015 च्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अनुसूचित जमाती राखीव असलेल्या गटांना वगळून त्याव्यतिरिक्त असलेल्या 19 गटांना अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले. आरक्षित जागांची संख्या पूर्ण करण्याकरता अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेल्या 18 अग्रक्रमाच्या गटांना यावेळी पुन्हा आरक्षित करण्यात आले. अनुसूचित जमातीसाठी 19 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 19 गटामधून नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या 15 जागा आणि त्यातून 8 महिलांकरता आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच सर्वसाधारण 4 जागांमधून 2 जागांवर सर्वसाधारण महिलांकरता आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

    पालघर जिल्ह्यातील सातपाटी, शिरगाव, केळवे, माहीम तारापूर, कळंब, अर्नाळा, दांडी, चिंचणी, धाकटी डहाणू हे किनारपट्टीवरील गट अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवताना अन्य मनोर, सफाळे, खैरवाडी, वंजारवाडा, पास्थळ व सरावली या शहरी भागांमध्ये अनुसूचित जमाती करता राखीव जागा ठेवण्यात आल्याने अनेक इच्छुक नाराज झाल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद आरक्षण 2020:-

अनुसूचित जाती (1): बोईसर
महिला सर्वसाधारण (2): जामशेत, शिगाव-खुंटड

सर्वसाधारण (2): कुर्झे, उटावली

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (8): बोर्डी, कासा,पोशेरा, गारगाव, मोज, मांडा, सावरे- ऐंबुर

नागरीकांचा मागास प्रवर्ग (7): उधवा, सरावली(डहाणू), वणई, आलोंडे, आसे, आबिटघर

अनुसूचित जमाती महिला (19): सुत्रकार, मोडगाव, गंजाड, तलवाडा, वावर, कासटवाडी, कौलाळे, खोडाळा, दांडी, सरावली(पालघर), खैरापाडा, ब्राह्मणपुर, सातपाटी, माहीम, केळवे, एडवण, सफाळे, अर्नाळा, कळंब

अनुसूचित जमाती (18):उपलाट, डोंगारी, झाई, धामणगाव, सायवन, ओसरविरा, कैनाड, धाकटी डहाणू, चिंचणी, दादडे, न्याहाळे, कुडूस, तारापूर, पास्थळ, वंजारवाडा, मनोर, भाताणे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.