ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : पालघरमध्ये 9 लाख उबलेली अंडी, पावणे दोन लाख कोंबड्यांची पिल्ली केली नष्ट

author img

By

Published : Mar 9, 2020, 2:41 PM IST

Updated : Mar 9, 2020, 7:28 PM IST

कोंबडीच्या मांसाला उठाव नसल्याने जिल्ह्यातील एका व्यावसायिकाने 9 लाख उबलेली अंडी तसेच पावणे दोन लाख नवजात कोंबड्यांच्या पिल्लांना नाईलाजाने जमिनीमध्ये पुरले आहे.

Palghar
पावणे दोन लाख कोंबड्या केल्या नष्ट

पालघर - कोरोना विषाणूच्या भीतीपोटी व समाज माध्यमांवर याविषयी पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांनी कोंबडीचे मांस खाण्याचे प्रमाण कमी केले आहे. मात्र, यामुळे कुकूटपालन व्यवसायावर व परिणामी कुकुटपालन व्यावसायिकांवर मोठे संकट उद्भवले आहे. कोंबडीच्या मांसाला उठाव नसल्याने जिल्ह्यातील एका हॅचरी मालकाने 9 लाख उबलेली अंडी तसेच पावणे दोन लाख नवजात कोंबड्यांच्या पिल्लांना नाईलाजाने जमिनीमध्ये पुरले आहे.

पालघरमध्ये पावणे दोन लाख कोंबड्या नष्ट

हेही वाचा - महिला दिन विशेष : बचतगटाच्या माध्यमातून 'त्या' होताहेत सक्षम, मत्स्य व्यवसायातून साधला आर्थिक विकास

पालघर जिल्ह्यात डॉ. सुरेश भाटलेकर यांच्या दोन हॅचरी व 35 पोल्ट्री उद्योग आहेत. सद्यस्थितीत त्यापैकी 10 शेडमध्ये सुमारे 90 हजार कोंबड्या विक्रीसाठी तयार अवस्थेमध्ये आहेत. त्यांना बाजारामधून आवश्यक प्रमाणात उठाव नाही. कोंबडीच्या पिल्लांपासून सुमारे 2 किलोची कोंबडी बनण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी लागतो. यावर कुकुटपालन केंद्राच्या मालकांकडून 75 रुपयांचा खर्च होतो. मात्र, कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी मांसाहार करण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच होळीच्या निमित्ताने होणारी खरेदी अपेक्षित प्रमाणात झाली नसल्याने या कुकुटपालन व्यवसायासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

जिल्ह्यातील या कुक्कुटपालन व्यवसायिकांनी 300 टन इतके कोंबडीचे मांस कापून शीतगृहामध्ये ठेवले आहे. त्यासाठी लागणारे ब्लास्ट फ्रिजर व कूलर याकरिता भाडे असे किमान 10 ते 15 रुपये प्रति किलो अतिरिक्त खर्च या व्यवसायिकांना उचलावा लागत आहे. त्याचप्रमाणे कुकूटपालन क्षेत्रात खाद्य म्हणून लागणाऱ्या मक्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे खाद्यांच्या दरांमध्ये देखील सुमारे 6 रुपये प्रति किलो अशी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. सध्या घाऊक बाजारपेठेत जिल्ह्यात 12 ते 14 रुपये प्रति किलो इतक्या दराने कोंबड्यांची विक्री होत आहे.त्यामुळे नव्याने पिल्ले तयार झालेली सुमारे 9 लाख अंडी डहाणूच्या एका कुकुटपालन व्यावसायिकाने नाईलाजास्तव फोडून खड्ड्यामध्ये पुरली आहेत.

हेही वाचा - सुर्योदय शिक्षण संस्थेच्या पा. न. कोरे विद्यालयात चोरी; टीव्ही, ईन्व्हर्टरसह रोख रक्कम लंपास

Last Updated : Mar 9, 2020, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.